28 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरविशेष“आंदोलन करणारा एक बुलंद आवाज हरपला”

“आंदोलन करणारा एक बुलंद आवाज हरपला”

शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

Google News Follow

Related

शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि मराठा आरक्षण आंदोलनचा आवाज विनायक मेटे यांचं आज, १४ ऑगस्ट रोजी अपघाती निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांच्या धक्कादायक निधनानंतर राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनायक मेटे यांच्या गाडीला झालेल्या अपघाताची चौकशी करण्याचे निर्देश दिले असून त्यांनी शोक व्यक्त केला आहे. “शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघातामध्ये दुर्दैवी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने शिवस्मारक, मराठा आरक्षण तसेच महाराष्ट्रातील इतर विषयांकरिता आंदोलन करणारा एक बुलंद आवाज हरपला. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो,” असे ट्विट त्यांनी केले आहे.

“तळागाळातील विषयांची माहिती विनायक मेटे यांना असायची. राज्याच्या राजकारणात त्यांनी वेगळं अस्तित्व सिद्ध केले आहे. मराठा समाजाला नेतृत्व देणारे व्यक्तिमत्व हरपले आहे,” अशा भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.

गेली अनेक वर्ष विनायक मेटे यांनी महाराष्ट्रासाठी मोलाची कामगिरी केली असून ते सातत्याने मराठा आरक्षण मुद्द्यावर आवाज उठवायचे. सामाजिक प्रश्नाची मांडणी शास्त्रशुद्ध पद्धतीने ते करत असत. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

स्टॉक मार्केटमधील ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन

नुपूर शर्मांची हत्या करण्यासाठी आलेल्या दोन दहशतवाद्यांच्या आवळल्या मुसक्या

धक्कादायक! जळगावमध्ये भावाकडून बहिणीसह प्रियकराची हत्या

विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूमुळे राज्यभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई- पुणे महामार्गावर आज पहाटे त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यानंतर त्यांच्यावर उद्या, १५ ऑगस्ट रोजी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
194,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा