लाऊडस्पीकरची परवानगी घेणारी मशीद, मंदिर कायदेशीर आहे का हे तपासणार?

लाऊडस्पीकरची परवानगी घेणारी मशीद, मंदिर कायदेशीर आहे का हे तपासणार?

लाऊडस्पीकरच्या वादावर मुंबई पोलिसांचा निर्णय

मुंबई पोलिसांनी लाऊडस्पीकर आणि त्यासंदर्भातील प्रक्षोभक वक्तव्यांसंबंधीच्या तक्रारींवर काम सुरू केले आहे. मुंबई पोलिसांनी यापूर्वी समाजविघातक कृत्ये, चिथावणी खोर वक्तव्य, धार्मिक गुन्ह्यात गुंतलेल्या आरोपींची यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे.

आयपीसी कलम १४४, १४९ आणि १५१ इत्यादी अंतर्गत अनियंत्रित घटकांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा विचार केला जात आहे. काही लोकांना आधीच प्रतिबंधात्मक प्रमुख म्हणून नोटीस बजावण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक उपायांसाठी नोटिसा पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हे ही वाचा:

इस्लामिक दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मारले गेलेल्या संघ स्वयंसेवकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन

शांतनू गुप्ता लिखित, मल्हार पांडे अनुवादित ‘भाजपा : काल, आज, उद्या’ या पुस्तकाचे देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते प्रकाशन

कुतुबमिनारजवळच्या मशिदीसाठी उद्ध्वस्त केली होती २७ मंदिरे

जहांगीरपुरी हिंसाचारातील ३०० आरोपींची ओळख पटली

अनेक मशिदी आणि मंदिरे कायदेशीररित्या बांधली गेली आहेत, परंतु जी बेकायदेशीर आहेत किंवा सर्व नियमांचे पालन न करता बांधलेली आहेत, त्यांना लाऊडस्पीकरला परवानगी दिली जाणार नाही. मुंबई पोलीस रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत ध्वनिप्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करतील अशाच मंदिर आणि मशिदींमध्ये लाऊडस्पीकरला परवानगी दिली जाईल.

ज्या धार्मिक संस्था सायलेंट झोनमध्ये नाहीत त्यांनाच लाऊडस्पीकरला परवानगी दिली जाईल. तसेच लाऊडस्पीकरची परवानगी घेणारी मशीद किंवा मंदिराची रचना कायदेशीर आहे की नाही हे देखील पाहिले जाईल.

बेकायदेशीर लाऊडस्पीकर आणि उल्लंघन करणार्‍यांवर महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम ३३w आणि १३५ सह सर्व विद्यमान नियमांनुसार कारवाई केली जाईल, ज्या अंतर्गत नियमांचे उल्लंघन करणारे लाऊडस्पीकर जप्त केले जातील आणि १२ हजार रुपयांच्या दंडाची तरतूदही केली जाईल.

Exit mobile version