27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषतोडफोड करणाऱ्या तरुणांना ‘अग्निपथ’चा मार्ग बंद

तोडफोड करणाऱ्या तरुणांना ‘अग्निपथ’चा मार्ग बंद

Google News Follow

Related

पोलिसांचे प्रमाणपत्र भर्तीसाठी अनिवार्य

केंद्र सरकारच्या अग्निपथ या योजनेवर होत असलेल्या टीकेनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांमध्ये पुन्हा चर्चा झाली. त्यानंतर काही महत्त्वाच्या घोषणा रविवारी करण्यात आल्या. त्यात लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी स्पष्ट केले की, सेनादलात शिस्तीला महत्त्व आहे. तिथे तोडफोड, दंगे करणाऱ्या तरुणांना अजिबात स्थान नाही. त्यामुळे ती व्यक्ती कोणत्याही अशा आंदोलनात, तोडफोडीत सामील नाही हे त्याला सिद्ध करावे लागेल. त्यासाठी या इच्छुक व्यक्तीने पोलिसांचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय, त्याला संधी नाही.

अनिल पुरी यांनी पत्रकार परिषद घेत या योजनेतील महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले. पुरी म्हणाले की, सध्या काहीठिकाणी उग्र आंदोलने सुरू आहेत ती आम्हाला अपेक्षित नव्हती. पण आम्ही बेशिस्त खपवून घेणार नाही. त्यामुळेच अग्निपथ योजनेत दाखल होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण कोणत्याही हिंसक आंदोलनात, दंगलीत नव्हतो हे सिद्ध करावे लागेल. जर तरुणावर एफआयआर असेल तर त्यांना भर्तीत प्रवेश नाही.

पुढील ४-५ वर्षांत सैनिकांची संख्या ५० ते ६० हजारांपर्यंत वाढविण्यात येईल. ती नंतर ९० हजार ते १ लाखांपर्यंतही वाढविली जाईल. सध्या आम्ही ४६ हजार जवानांचा समावेश करणार आहोत कारण आम्हाला या योजनेचा अंदाज घ्यायचा आहे, जेणेकरून त्यासाठी आवश्यक त्या सुविधा उभारता येतील.

या अग्निवीरांनी जर देशरक्षण करताना प्राण गमावले तर त्यांना देशासाठी केलेल्या सर्वोच्च त्यागाबद्दल त्यांच्या कुटुंबाला १ कोटी रुपयांची भरपाई दिली जाईल. पुरी यांनी असेही सांगितले की, सियाचेन आणि इतर भागात सेवेत असलेल्या सैनिकांप्रमाणेच अग्निवीर सैनिकांनाही भत्ते दिले जातील. सेवाकाळात त्यांच्याबाबतीत कोणताही भेदभाव केला जाणार नाही.

यावेळी उपस्थित असलेले लेफ्ट जनरल बन्सी पोनाप्पा यांनी सांगितले की, डिसेंबरपर्यंत २५ हजार अग्निवीर नियुक्त केले जाती. आणि दुसरी तुकडी फेब्रुवारी २०२३पर्यंत भर्ती होईल. त्यातून ४० हजारांचे लक्ष्य गाठले जाईल. २१ नोव्हेंबरपासून नौदलातील अग्निवीर आयएनएस चिल्का, ओदिशा येथे प्रशिक्षणासाठी जातील. महिला आणि पुरुष अशा दोघांनाही ही संधी असेल.

हे ही वाचा:

५०० वर्षांनी कालिका मंदिरावर पंतप्रधान मोदींनी फडकाविली पताका; मेहमूद बेगडाने तोडले होते मंदिर

बिहारमधून ७१८ आंदोलकांना अटक; १३८ गुन्हे दाखल

सायबर चोरट्यांनी सीए तरुणीला दीड लाख रुपयांचा घातला गंडा

दिव्यत्त्वाने नटलेली भारतीय संस्कृती

 

२४ जूनपासून पहिल्या बॅचची नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. २४ जुलैपासून ऑनलाइन परीक्षा घेतल्या जातील. तर डिसेंबरपर्यंत पहिली बॅच भर्ती होईल. पुरी यांनी सांगितले की, अग्निवीरसंदर्भात ज्या घोषणा केल्या जात आहेत, त्या पूर्वी ठरवल्याप्रमाणेच होत्या. आताच्या परिस्थितीमुळे ते निर्णय घेण्यात आलेले नाहीत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा