25 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरविशेषपोलिसांनी आता दांडा नव्हे तर डेटाच्या आधारे काम करावे

पोलिसांनी आता दांडा नव्हे तर डेटाच्या आधारे काम करावे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

Google News Follow

Related

नागरिक प्रथम, सन्मान प्रथम आणि न्याय प्रथम या भावनेने नवीन गुन्हेगारी कायदे तयार करण्यात आले आहेत. पोलिसांनी आता दांडा ऐवजी डेटाच्या आधारे काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. जयपूर येथे पोलिस महासंचालक/महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेच्या समारोपाच्याप्रसंगी ते बोलत होते.

हेही वाचा..

भारताच्या कठोर भूमिकेमुळे मालदीव उच्चायुक्तांची धावाधाव!

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; रोहित, विराटचे पुनरागमन

जय श्रीराम : गडचिरोलीतील सागवानातून निर्माण होणार राममंदिराचे दरवाजे

देशभरात २९,२७३ बनावट कंपन्या; ४४ हजार कोटींची जीएसटी चोरी

पंतप्रधान मोदी म्हणाले, नवीन कायदे लागू करणे हे गुन्हेगारी न्याय व्यवस्थेतील एक आदर्श बदल आहे. जागतिक प्रोफाइलमध्ये सुधारणा आणि देशाच्या वाढत्या राष्ट्रीय सामर्थ्याच्या अनुषंगाने २०४७  पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी भारतीय पोलिसांनी स्वतःला आधुनिक आणि जागतिक दर्जाच्या पोलिस दलात बदलले पाहिजे. नव्याने लागू करण्यात आलेल्या कायद्यांमागील भावना समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्याच्या पोलिस प्रमुखांनी कल्पकतेने विचार करावा. महिला आणि मुलींना नवीन गुन्हेगारी कायद्यांतर्गत त्यांना प्रदान करण्यात आलेले अधिकार आणि संरक्षण याबद्दल संवेदनशील बनविण्यावर भर देऊन त्यांनी पोलिसांना महिलांना “कभी भी और कहीं भी’ निर्भयपणे काम करता येईल याची खात्री करून महिला सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, नागरिकांमध्ये पोलिसांची सकारात्मक प्रतिमा अधिक मजबूत करण्याची गरज आहे. नागरिकांच्या हितासाठी सकारात्मक माहिती आणि संदेश प्रसारित करण्यासाठी पोलिस स्टेशन स्तरावर सोशल मीडियाचा वापर करावा. नागरिकांशी संपर्क वाढवण्याचा मार्ग म्हणून पोलिसांनी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करावे. सरकारी अधिकार्‍यांना स्थानिक लोकांशी अधिक चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी सीमावर्ती गावांमध्ये राहावे, कारण ही सीमावर्ती गावे भारतातील ‘पहिली गावे’ आहेत. तीन दिवसीय संमेलनाचा समारोप करताना मोदींनी विशिष्ट सेवांसाठी पोलीस पदकाचे वितरण केले. या परिषदेत राष्ट्रीय सुरक्षेच्या महत्त्वाच्या घटकांवर चर्चा करण्यात आली, ज्यात नव्याने लागू करण्यात आलेले गुन्हेगारी कायदे, दहशतवादविरोधी धोरणे, डाव्या विचारसरणीचा अतिरेक, सायबर धमक्या, जगभरातील कट्टरताविरोधी उपक्रमांचा समावेश आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा