युगेंद्र पवार यांच्या वडिलांच्या शरयू मोटर्समध्ये पोलिसांचे सर्च ऑपरेशन

बारामतीमध्ये खळबळ

युगेंद्र पवार यांच्या वडिलांच्या शरयू मोटर्समध्ये पोलिसांचे सर्च ऑपरेशन

प्रचार सभेचा कालचा शेवटचा दिवस पार पडला असून आता उद्या (२० नोव्हेंबर) विधानसभेचे एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहेत. यावेळी राज्यात कोणाची सत्ता येईल याकडे सर्वांचे लक्ष्य लागून आहे. शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्याने एकेकाळी एका पक्षात असलेले नेते एकमेकांविरुद्ध उभे राहिले आहेत. बारामतीमध्ये तर एकाच घरातील नेते एकमेकांविरुद्ध उभे आहेत. त्यामुळे राज्यातील महत्वपूर्ण जागेसह बारामतीकडे राज्यासह देशाचे लक्ष्य लागून आहे. याच दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या वडिलांच्या शरयू मोटर्समध्ये पोलिसांनी काल रात्री सर्च ऑपरेशन राबवल्याची माहिती समोर आली आहे.

बारामतीत शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार हे अजित पवार यांच्याविरुद्ध मैदानात उभे आहेत, त्यामुळे काका विरुद्ध पुतण्या अशी लढत बघायला मिळणार आहे. शरद पवार आणि अजित पवार यांनी प्रचार सभेत एकमेकांवर टीकाही केल्या आहेत. अशातच युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या शरयू मोटर्समध्ये पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवले आहे. पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सर्च ऑपरेशन राबवण्यात आल्याची माहिती आहे.

हे ही वाचा : 

दिव्यांग, ज्येष्ठांना मतदानासाठी मोफत वाहन व्यवस्था

वॉन्टेड नक्षल नेता विक्रम गौडा चकमकीत ठार

मतदानावेळी मुस्लिम महिलांचा बुरखा काढून तपास करू नये; सपाचे निवडणूक आयोगाला पत्र

स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधींना समन्स

पोलिसांनी सर्च ऑपरेशन का राबवले, यामध्ये पोलिसांच्या हाती काय लागले?, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. याबाबत पोलिसांनी अद्याप काहीही माहिती दिलेली नाही. मात्र, यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या सर्च ऑपरेशनबाबत उमेदवार युगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरयू मोटर्समध्ये चौकशी केली असता काहीही सापडल्याचे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

विकास कोण करेल हे ठरवा? निराशा झटका आणि मतदानाला उतरा! | Mahayuti Sarkar | MVA |Maharashtra Election

 

Exit mobile version