कर्नाटकच्या मंड्या जिल्ह्यातील केरागोडू गावात हनुमान ध्वजावरून (भगवा) वाद वाढत आहे. मागील आठवड्यामध्ये काही पुरुषांनी मिळून १०८ फूट उंच ध्वजस्तंभ उभारून त्यावर हनुमानाचा झेंडा फडकावला होता.हा झेंडा खाली उतरवण्यावरून कर्नाटकात काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकीय संघर्ष सुरू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा ध्वजस्तंभ लावण्यास ग्रामपंचायतीकडून परवानगी देण्यात आली होती.त्यानंतर मागील आठवड्यामध्ये काही व्यक्तींनी मिळून १०८ फूट ध्वजस्तंभ उभारून त्यावर हनुमानाचा झेंडा फडकवला.परंतु, त्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.यानंतर हनुमानाचा झेंडा खाली उतरवण्याची विनंती अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.मात्र, गावकऱ्यांनी याला विरोध करत, काही लोक याचे राजकारण करत आहेत असा आरोप गावकऱ्यांनी केला.या ठिकाणी भाजप, जेडीएस आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने तेथे जमले आणि त्यांनी ध्वज खांब हटवल्याबद्ल निषेध केला.
हे ही वाचा:
नोकरी-जमीन घोटाळा प्रकरणी लालू यादव चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल!
येत्या आठवड्यात देशात CAA लागू होईल, ही माझी गॅरंटी!
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवास्थानी ईडीचे पथक दाखल!
मालदीवच्या संसदेत तुफान हाणामारी!
गावात तणाव निर्माण झाल्याने आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.झेंडा काढण्याच्या निषेधार्थ गावकऱ्यांकडून दुकाने बंद ठेवण्यात आली.शनिवारी ग्रामपंचायतीचे अधिकारी झेंडा काढण्यासाठी गावात आले असता गावकऱ्यांनी त्यांचा निषेध करत ‘गो बॅक’च्या घोषणा दिल्या.
दरम्यान, झेंडा हटवल्याच्या निषेधार्थ भाजप आणि हिंदुत्व कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.भाजपने कर्नाटकच्या प्रत्येक जिल्ह्यात आंदोलनाला सुरुवात केली आहे.भाजप नेते आर अशोक यांनी याप्रकरणी सरकारवर ‘हिंदूविरोधी भूमिका’ असल्याचा आरोप केला आहे.यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले की, देशाचा ध्वज काढून त्याठिकाणी भगवा ध्वज लावण्यात आला होता.हे योग्य नसल्याचे ते म्हणाले.त्यामुळे मी पुन्हा अधिकाऱ्यांना राष्ट्रध्वज फडकवण्यास सांगितले आहे.