25 C
Mumbai
Thursday, January 9, 2025
घरविशेषअलिगडमध्ये लाऊडस्पीकर हटाव मोहीम तेजीत; ११२ ठिकाणी 'आवाज बंद'

अलिगडमध्ये लाऊडस्पीकर हटाव मोहीम तेजीत; ११२ ठिकाणी ‘आवाज बंद’

मानकांनुसार अनेक लाऊडस्पीकरचा आवाज केला कमी

Google News Follow

Related

शहरातील शांतता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन धार्मिक स्थळांवर लावलेले लाऊडस्पीकर हटवण्याचे काम करत आहेत. निर्धारित डेसिबलपेक्षा जास्त आवाजावर ही कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी (८ जानेवारी) तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मशिदींवरून ११२ अनधिकृत लाऊडस्पीकर हटवण्यात आले आहेत.

पोलीस क्षेत्र अधिकारी तृतीय अभयकुमार पांडे यांनी पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन्स येथे शांतता समितीची बैठक घेतली. त्यामध्ये परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, धर्मगुरू, डिजिटल स्वयंसेवक, ग्रामप्रमुख, ग्रामरक्षक सहभागी झाले होते. धार्मिक स्थळांवर लावलेल्या लाऊडस्पीकरचा वापर, शांतता राखणे आणि समाजातील अफवा रोखणे इत्यादी प्रमुख मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली.

जिल्हा प्रशासनाच्या परवानगीशिवाय लावलेले अनधिकृत लाऊडस्पीकर काढण्याची मोहीम सुरू करण्यात आल्याचे बैठकीत सांगण्यात आले. त्याअंतर्गत क्वार्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २६ अनधिकृत लाऊडस्पीकर हटविण्यात आले. मानकांनुसार ३२ लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्यात आला. सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ६८ अनधिकृत लाऊडस्पीकर हटवण्यात आले. मानकांनुसार ५७ लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्यात आला. जवान पोलीस ठाणे हद्दीतील १८ अनधिकृत लाऊडस्पीकर हटविण्यात आले आहेत.

हे ही वाचा : 

लॉस एंजेलीसमधील आगडोंबामुळे १ लाख लोकांना घर सोडण्याच्या सूचना

अफगाणिस्तानला टाळी, पाकिस्तानला टपली

उत्तराखंडच्या डेहराडूनमध्ये ५७ बेकायदेशीर मदरसे; होणार कारवाई

रशियाचा युक्रेनच्या झापोरिझिया शहरावर क्षेपणास्त्र हल्ला; १३ ठार

भविष्यातही प्रशासनाच्या परवानगीनुसारच लाऊडस्पीकरचा वापर केला जाईल, असे स्पष्टीकरण पोलीस क्षेत्र अधिकारी अभयकुमार पांडे यांनी दिले आहे. शहरी भागात अधिकाधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहनही त्यांनी केले. सार्वजनिक ठिकाणांवर लक्ष ठेवणे आणि कायदा व सुव्यवस्था मजबूत करणे हा त्याचा उद्देश आहे. समाजात शांतता राखण्यासाठी सर्वसामान्यांना अफवा आणि खोट्या बातम्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा