पोलिस भरतीसाठी इच्छुक असलेल्यांना खुशखबर!! लवकरच जागा भरणार

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

पोलिस भरतीसाठी इच्छुक असलेल्यांना खुशखबर!! लवकरच जागा भरणार

राज्यात पोलिसांची २० हजार पदे भरण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. गृहखात्याच्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली .राज्यातील हजारो तरूण गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत होते. या भरतीमुळे त्यांचे पोलीस भरतीचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करून आम्ही पोलीस भरतीबाबत निर्णय घेतला आहे.  ८ हजार पदांबाबत जाहिरात निघाली असून आणखी १२ हजार पदांची जाहिरात लवकरच काढण्यात येईल,’ अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे. सध्या ७,२३१ पदांना मान्यता देण्यात आली असून, इन-कॅमेरा चाचणीसाठी २० मैदाने तयार करून भरती प्रक्रिया सुरू आहे.

हे ही वाचा:

भारतात चाइल्ड पोर्नोग्राफीविरोधात ‘ऑपरेशन मेघदूत’

बारावीनंतर विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना करता येणार नोकरी

नवरात्र २०२२: महाराष्ट्राचं शक्तीस्थळ तुळजापूर

नवरात्रीसाठी बाजार फुलले, धारावीच्या कुंभारवाड्यात लगबग सुरू

यामुळे राज्यातील सर्व पोलीस उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून पोलीस भरती संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे काढण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं
महाराष्ट्रात ७५ हजार पोलिसांची भरती करण्याची घोषणा केली आहे. भरती पोलीस भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या आधी शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी मुंबईतील वीस मैदाने सज्ज ठेवण्यात येणार आहेत ही भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

Exit mobile version