संभलच्या जामा मशिदीसमोर बांधण्यात येतेय नवीन पोलीस चौकी!

मोजमापाचे काम सुरु 

संभलच्या जामा मशिदीसमोर बांधण्यात येतेय नवीन पोलीस चौकी!

उत्तर प्रदेशातील संभलमध्ये जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान एएसआयच्या पथकावर हल्लेखोरांकडून हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोरांनी पथकावर दगडफेक करत परिसरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडवून आणला होता. तोडफोड आणि जाळपोळ हल्लेखोरांकडून करण्यात आली होती. या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला होता. यासह अनेक पोलीस जखमी झाले होते. याच दरम्यान, युपी पोलिसांनी संभलमध्ये मोठे पाऊल उचलले आहे. जामा मशिदीसमोर नवीन पोलिस चौकी बांधण्यात येत आहे.

संभल येथील जामा मशिदीसमोरचा ही नवीन पोलिस चौकी बांधण्यात येणार आहे. याठिकाणी २४ तास पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहेत. चौकीच्या बांधकामासाठी पोलिसांनी संबंधित ठिकाणी चुना लावून खुणाही केल्या आहेत. याठिकाणी पोलीस बळाची गरज असल्याने नवीन चौकी बांधण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले.

मशिदीसमोर पोलिस चौकी बांधण्याच्या हालचालीवर मशिदीच्या बाजूचे वक्तव्यही समोर आले आहे. ज्याठिकाणी नवीन पोलीस चौकी बांधण्यात येत आहे, त्यातील निम्मी जमीन वक्फ बोर्डाची आहे आणि उर्वरित जमीन ही खाजगी मालमत्ता आहे. मस्जिद समितीच्या लोकांनी सांगितले की, आम्हाला अचानक सांगण्यात आले की येथे पोलिस चौकी बांधण्यात येणार आहे.

हे ही वाचा : 

‘सनातन धर्म : सर्व विज्ञानांचा खरा स्रोत’ च्या मराठी आवृत्तीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते प्रकाशन

अलिगढ विद्यापीठात ३ बांगलादेशी विद्यार्थ्यांना बंदी, कधीही प्रवेश मिळणार नाही!

येमेन दौऱ्यावर असलेले डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस इस्रायली हल्ल्यातून थोडक्यात बचावले

बांगलादेश भारताकडून तांदूळ आयात करणार

दरम्यान, २४ नोव्हेंबर रोजी मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी ४० हून अधिक जणांना अटक केली. दरम्यान, या नव्या पोलीस चौकीचे नाव काय असेल याबाबत माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘सत्यव्रत पुलिस चौकी’ असे या नव्या चुकीचे नाव असणार आहे.

Exit mobile version