कानपूरमधील अन्वर-कासगंज मार्गावर कालिंदी एक्स्प्रेसला उलटवण्याच्या कट प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. नामचीन गुंड शाहरुखला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांकडून सध्या त्याची चौकशी सुरु आहे. या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी १० जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, त्यापैकी सहा जणांची चौकशी करून सोडण्यात आले आहे.
या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी म्हणून नामचीन गुंड शाहरुखला ताब्यात घेतले आहे. आतापर्यंत तो सर्वात संशयास्पद मानला जात आहे. पश्चिम बंगालहून परतलेल्या नामचीन गुंड शाहरुखला एटीएसने ताब्यात घेतले. त्याची चौकशी करण्यात येत आहे. शिवराजपूर पोलिस ठाण्यात शाहरुखवर अनेक गुन्हे दाखल आहेत. काही काळापूर्वी कन्नौजमध्ये झालेल्या एका मोठ्या चोरीत त्याचे नाव पुढे आले होते आणि तो तुरुंगात गेला होता. फतेहपूर येथेही त्याने गुन्हे केल्याची माहिती मिळाली आहे.
हे ही वाचा :
जगप्रसिद्ध चित्रकार एस.एच. रझा यांच्या कोट्यवधीच्या पेंटिंगची चोरी
‘राहुल गांधी, सोनिया गांधींनी चिनी कम्युनिस्ट पार्टीशी असा कोणता करार केला?’
राहुल गांधींचा अजब दावा… भारतात शिखांना पगडी, कडे घालू द्यायचे की नाही, यावरून संघर्ष!
मणिपूर अशांत; निदर्शने सुरूच, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, पाच दिवस इंटरनेट बंद !
कालिंदी एक्स्प्रेसची जेव्हा घटना घडली तेव्हा शाहरुखने सायंकाळी ७.१५ वाजता घटनास्थळापासून काही अंतरावर बांधकाम सुरू असलेल्या भात गिरणीजवळ उभा असताना सेल्फी काढला आणि व्हॉट्सॲप स्टेटसवर अपलोड केला होता. यानंतर ८.२५ वाजता ही घटना घडली. याशिवाय पोलिसांनी या परिसरातील आणखी दोन हिस्ट्री शीटर गुन्हेगारांनाही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.