रणरणत्या उन्हात ५५ वर्षांहून अधिक वयाच्या पोलिसांना तैनात करू नये

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोलीस आयुक्तांना सूचना

रणरणत्या उन्हात ५५ वर्षांहून अधिक वयाच्या पोलिसांना तैनात करू नये

दिवसेंदिवस सूर्य आग ओकतोय. उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झालेत, घामाच्या धारा निघताहेत. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५५ वर्षांहून अधिक वय असलेल्या वाहतुक पोलिसांसाठी आनंदाची बातमी देऊन संवेदनशीलपणा काय असतो, याचे एक उत्तम उदाहरण दिले आहे. ५५ वर्षांहून अधिक वय असलेल्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिलेले आहेत. 

रणरणत्या दुपारच्या कडक उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सावलीसाठी तात्पुरत्या शेड्स तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. गजर आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :

नाद एकच; बैलगाडा शर्यतीला सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदील !

भारतात AMAZON करणार अब्जावधी गुंतवणूक

‘द केरळ स्टोरी’ बंगालमध्ये प्रदर्शित होणार

तापमान; दर पाच वर्षांनी विक्रमी उष्णतेच्या लाटा !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याहून मुंबईच्या दिशेने येत असताना त्यांना भर उन्हात जागोजागी कर्तव्य बजावत असलेले वाहतूक पोलिस दिसले. यातील अनेक पोलिसांचे वय पन्नासहून अधिक असूनही हे भर उन्हात कर्तव्य बजावत असल्याचे त्यांनी पाहिले. तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना फोन लावला आणि यापुढे ५५ वर्षांवरील वाहतूक पोलिसांना भर उन्हात रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये, असे आदेश दिले. तसेच या वाहतूक पोलिसांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी त्यांना छत्री, जागोजागी उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी तात्पुरत्या शेड्स आणि पिण्याचे पाणी पुरवण्याची सूचनाही केली. या सुचनेमुळे वाहतूक पोलिसांचे आयुष्य सुसह्य व्हावे यासाठी घेतलेले हे सकारात्मक पाऊल दिलासादायक ठरणार आहे.

Exit mobile version