26 C
Mumbai
Monday, July 8, 2024
घरविशेषमहिला कॉन्स्टेबलसोबतची लगट भोवली!

महिला कॉन्स्टेबलसोबतची लगट भोवली!

पोलीस उपाधीक्षकाचा झाला कॉन्स्टेबल

Google News Follow

Related

एका हॉटेलमध्ये महिला कॉन्स्टेबलसोबत सापडलेल्या उत्तर प्रदेशचे पोलीस उपाधीक्षक कृपा शंकर कन्नौजिया यांची कॉन्स्टेबल पदावर पदावनती केली आहे. कनौजिया यांनी याआधी उन्नावमध्ये सर्कल ऑफिसर बिघापूर या पदावर काम केले होते. सध्या त्यांची गोरखपूरमधील २६ व्या प्रांतीय सशस्त्र कॉन्स्टेब्युलरी बटालियनमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. जुलै २०२१ मध्ये हा प्रकार घडला होता.

कनौजियाने कौटुंबिक कारणास्तव रजा मागितली होती. मात्र ते घरी गेलेच नाहीत. तर ते त्या महिला कॉन्स्टेबलसह कानपूरमधील एका हॉटेलमध्ये गेले. त्यावेळी त्यांनी आपले दोन्ही मोबाईल बंद केले होते. त्यांचा संपर्क होत नसल्याने घरी चिंतेत असलेल्या त्यांच्या पत्नीने मदतीसाठी उन्नावशीच्या एसपी यांच्याकडे मदत मागितली.

हेही वाचा..

‘सामना’च्या कार्यालयाबाहेर संजय राऊतांना बॅनरमधून आव्हान!

लैंगिक अत्याचार प्रकरणी प्रज्वल रेवण्णाच्या भावालाही अटक!

नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या प्रमुखाची हकालपट्टी!

मेरठच्या तुरुंगात कैद रवी अत्री नीट पेपरफुटीचा सूत्रधार असण्याची शक्यता!

त्यानंतर पोलीस तपास सुरु करण्यात आला. तेव्हा त्यांचा मोबाईल हा कानपूरच्या हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर बंद झाल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे सगळेच गोंधळले होते. उन्नाव पोलीस तत्काळ त्या हॉटेलमध्ये पोहोचले. त्यावेळी हा पोलीस उपाधीक्षक आणि संबंधित महिला कॉन्स्टेबल एकत्र आढळले. सीसीटीव्ही कॅमेरा तपासणी नंतर हे दोघे एकत्र आल्याचे समोर आले.

या घटनेचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला. सखोल चौकशी केल्यानंतर कृपा शंकर कनौजिया यांना कॉन्स्टेबल पदावर पदावनती करण्याची शिफारस करण्यात आली. एडीजी प्रशासनाने तातडीने या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश जारी केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
163,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा