पोलीस अधिकारी मोहम्मद मोहसीन खानचा पीएचडी कार्यक्रम रद्द

लैंगिक शोषण केल्याचा आरोप

पोलीस अधिकारी मोहम्मद मोहसीन खानचा पीएचडी कार्यक्रम रद्द

आयआयटी रिसर्च स्कॉलरचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या उत्तर प्रदेशचे पोलीस अधिकारी मोहम्मद मोहसीन खान यांचा पीएचडी कार्यक्रम आयआयटी कानपूरने रद्द केला आहे. मोहसीन खान सायबर क्राइम आणि क्रिमिनोलॉजीमध्ये पीएचडी करत होते. भारतातील सर्वोच्च शैक्षणिक संस्थेने ही कारवाई यूपीच्या उच्च पोलीस कार्यालयाच्या शिफारशीनंतर केली आहे.

याबद्द्द्ल आयआयटी कानपूरचे संचालक डॉ. मनिंद्र अग्रवाल म्हणाले, डीजीपी यूपीच्या कार्यालयाने मंजुरी दिल्यानंतर मोहम्मद मोहसीन खानचा पीएचडी कार्यक्रम संपुष्टात आला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला २६ वर्षीय आयआयटी-कानपूरच्या संशोधक स्कॉलरने कानपूरमध्ये सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) म्हणून कार्यरत असलेल्या खानवर लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप केला. त्यानंतर त्याला त्याच्या कर्तव्यातून मुक्त करण्यात आले.

हेही वाचा..

राम मंदिराच्या पुजाऱ्यांसाठी ड्रेस कोड लागू!

मनालीत अडकलेल्या १० हजार पर्यटकांची सुटका

अण्णा विद्यापीठ लैंगिक अत्याचार प्रकरण : मद्रास उच्च न्यायालयाने स्वतःहून केली कारवाई

लैंगिक छळ आणि खंडणीप्रकरणी अभिनेता चरित बलप्पाला अटक

तक्रारीनुसार खान २०१३ बॅचचा प्रांतीय पोलीस सेवा (पीपीएस) अधिकारी कथितरित्या रिसर्च स्कॉलरशी संबंध विकसित केले आणि पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले. मात्र नंतर अधिकाऱ्याने आश्वासन पूर्ण करण्यास नकार दिल्याने महिलेने बलात्काराची तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर खान विरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि या प्रकरणाच्या तपासासाठी कानपूर पोलिसांनी एसआयटी स्थापन केली.

१९ डिसेंबर रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने खान यांच्या अटकेला स्थगिती देऊन तात्पुरता दिलासा दिला. दरम्यान, कानपूर पोलिसांचे सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी), अभिषेक कुमार पांडे यांनी तपासावर भाष्य करताना सांगितले की, “खान यांना पोलिसांनी या प्रकरणात त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी बोलावले आहे. महिलेलाही तिचे म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. आयआयटी रिसर्च स्कॉलरच्या तक्रारीवरून मोहसीन खानविरुद्ध गुन्हेगारी धमकावणे आणि बदनामी केल्याप्रकरणी दुसरी एफआयआर नोंदवण्यात आली आहे.

Exit mobile version