महाराष्ट्रातल्या ३३ पोलिसांना पोलीस शौर्य तर ४० पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक

स्वातंत्र्यदिनानिमित्त उल्लेखनीय कामगिरीसाठी ९५४ पोलिसांना पदके जाहीर

महाराष्ट्रातल्या ३३ पोलिसांना पोलीस शौर्य तर ४० पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक

स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरातील एकूण ९५४ पोलीस कर्मचार्‍यांना पोलीस पदके जाहीर करण्यात आली आहेत. पोलीस शौर्य पदक (पीएमजी) २२९ जणांना जाहीर करण्यात आले आहे. विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक (पीपीएम) ८२ जणांना तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक (पीएम) ६४२ जणांना जाहीर झाले आहे.

सर्वाधिक २३० शौर्य पुरस्कारांमधील १२५ पदके डाव्या अतिरेकी विचारसरणीच्या प्रभावित क्षेत्रात तैनात पोलिसांना, ७१ जम्मू व काश्मीर क्षेत्रातील आणि ११ पदके ईशान्य क्षेत्रातील पोलिसकर्मींना जाहीर झाली आहेत. शौर्य पुरस्कार जाहीर झालेल्या पोलिसांमध्ये सीआरपीएफचे २८, महाराष्ट्रातील ३३, जम्मू-काश्मीरचे ५५, छत्तीसगडचे २४, तेलंगणाचे २२ आणि आंध्र प्रदेशातील १८ पोलीस असून बाकीचे इतर राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि सीएपीएफचे आहेत.

राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक आणि पोलीस शौर्य पदक, जीवन आणि मालमत्ता यांचे संरक्षण किंवा गुन्हेगारीला पायबंद किंवा गुन्हेगारांना अटक करण्यासाठी उल्लेखनीय शौर्यासाठी दिले जाते. विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक  पोलीस सेवेतील खास उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाते. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक संसाधन आणि कर्तव्यनिष्ठेने बजावलेल्या अमूल्य सेवेसाठी प्रदान केले जाते.

हे ही वाचा:

 

इराणमधील प्रमुख शिया धार्मिक स्थळावर गोळीबार

फाळणी अर्थात ‘विभाजन विभिषिका दिनी’ स्मरण !

शिमल्यात भूस्खलन, शिव मंदिर कोसळून ९ जणांचा मृत्यू !

राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती, जयंत नाईकनवरे यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे.

Exit mobile version