जालना मध्ये भारतीय जनता पार्टीच्या युवा पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचेही निलंबन करण्यात आले आहे. जालनाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी महाजन यांचे निलंबन केले आहे. सोमवार, ३१ मे रोजी महाजन यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
जालन्यात पोलिसांनी तरुणाला केलेल्या मारहाणीचा व्हीडिओ २७ मे रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हीडिओमध्ये पोलीस एका युवकाला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. नातेवाईकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यामुळे रुग्णालयाची तोडफोड केल्यामुळे युवकाला पोलिसांनी चोप दिल्याचा दावा केला जात आहे. हा तरुण भाजपा कार्यकर्ता शिवराज नारियलवाला असल्याची माहिती नंतर समोर अली आहे.
हे ही वाचा:
सीबीएसई १२वी परीक्षा रद्द करण्याचा पंतप्रधान मोदींनी घेतला निर्णय
स्वपन दास गुप्ता पुन्हा राज्यसभेवर
विनानिविदा डायरी छपाईमुळे वाया गेली ‘ऊर्जा’
बनावट फेविपिरावीर औषधाचा साठा एफडीएकडून जप्त
शुक्रवार, २८ मे रोजी या प्रकरणाशी संबंधित काही पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली होती. निलंबन झालेल्यांमध्ये पोलिस उपनिरीक्षक भागवत कदम आणि अन्य चार जणांचा समावेश होता. पण तरीही या प्रकरणात पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यावर कारवाई करण्यात यावी शी मागणी जोर धरू लागली होती. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेली भारतीय जनता पार्टी या विषयी आक्रमक झाली असून. भाजपा नेते या विषयात सतत महाजन यांच्या निलंबनासाठी आग्रह करताना दिसत होते. अखेर ३१ मे च्या सोमवारी महाजन यांचे निलंबन करण्यात आले आहे.