22 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरविशेषमहाराष्ट्राच्या सुपुत्राने ‘वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स’मध्ये मिळवले सुवर्णपदक

महाराष्ट्राच्या सुपुत्राने ‘वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स’मध्ये मिळवले सुवर्णपदक

कॅनडा येथे पार पडली स्पर्धा

Google News Follow

Related

वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्समधील कुस्ती या खेळात महाराष्ट्राचे कुस्तीपटू, तीन वेळा ‘महाराष्ट्र केसरी’ विजेते आणि अप्पर पोलीस अधीक्षक विजय नथ्थू चौधरी यांनी यश मिळवले आहे. २९ जुलै २०२३ रोजी कॅनडा येथे झालेल्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्समध्ये कुस्ती या खेळामध्ये त्यांनी भारताला पदक मिळवून दिले.

वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स हे जागतिक स्तरावर पोलीस दलासाठी ऑलिम्पिक मानले जाते. विजय चौधरी यांचा पहिला सामना गतविजेत्या जेसी साहोटाशी होता. या महत्त्वाच्या सामन्यात चौधरी यांनी साहोटाचा ११-०८ अशा फरकाने पराभव केला. अंतिम सामन्यात, विजय चौधरी यांनी अमेरिकेच्या जे. हेलिंगर वर १० गुणांची मोठी आघाडी घेत अंतिम सामना ११-०१ ने जिंकत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले.

विजय चौधरी हे जळगावच्या चाळीसगाव जिल्ह्यातील सायगाव बगळी या गावचे आहेत. ते पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी तीन वेळा महाराष्ट्र केसरी चॅम्पियन आणि इतर अनेक मानाच्या कुस्ती स्पर्धांच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे. तसेच राष्ट्रीय सुवर्णपदकावर देखील विजय चौधरी यांनी आपले नाव कोरले आहे.

विजय चौधरी हे पुण्यातील कात्रज येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात अनेक महिने कॅनडाच्या टाइम झोननुसार प्रशिक्षण घेत होते. काही महिन्यांपासून त्यांचे प्रशिक्षक हिंदकेसरी रोहित पटेल यांनी त्यांना बायो बबलमध्ये ठेवले होते.

हे ही वाचा:

युक्रेनकडून रशियाच्या राजधानीच्या शहरावर ड्रोन हल्ला

कोंढव्यातील दहशतवाद्यांच्या घरातील फॅनमध्ये सापडली बॉम्ब बनवण्याची माहिती

स्टुअर्ट ब्रॉडची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

काश्मीरच्या कुलगाममध्ये सैनिक बेपत्ता; गाडीत सापडले रक्त

“काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र राज्य पोलीस दलासाठी सुवर्णपदक जिंकले होते. त्या दिवशीच ठरवले होते की जागतिक पोलीस खेळांमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकायचे. आता मेहनतीचे चीज झाले असून जागतिक स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक जिंकून भारतीय कुस्ती क्षेत्रासाठी भरीव कामगिरी केल्याचा आनंद आहे,” अशा भावना विअज्य चौधरी यांनी व्यक्त केल्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा