संपूर्ण पोलीस दल महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षिततेसाठी बांधील आहे, पोलीस सह आयुक्त सत्यनारायण चौधरी म्हणाले. महिला आणि मुले यांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई पोलिसांकडून ज्या सुविधा उपलब्ध आहेत, त्याबद्दलही त्यांनी माहिती दिली. जेव्हा गरज पडेल तेव्हा या सुविधांचा वापर करावा, असे आवाहन सत्यनारायण चौधरी यांनी केले.
गिरगावमध्ये रैल पदमसी आणि क्रिएट फाउंडेशन यांच्या २० व्या वर्धापनदीना निमित्त ‘अनटायटल्ड’ आणि ‘बिटर चॉकलेट’ या नाटकाच्या सादरीकरणावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सादर करण्यात आलेल्या नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी रैल पदमसी म्हणाले, आपण एकत्र काम केल्यावरच महाराष्ट्राला मुलांसाठी आणि महिलांसाठी सर्वात सुरक्षित राज्य बनवू शकतो. आधीपासून उपलब्ध असलेल्या माहितीचा प्रसार करण्यासाठी आम्ही पोलिस आणि न्यायव्यवस्थेला सहकार्य करण्यासाठी येथे आहोत; तसेच मुलांच्या आणि महिलांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात ज्या विविध योजना, कायदे आणि सुविधा उपलब्ध आहेत त्यांची अंमलबजावणी आणि विस्तारीकरण करण्यासाठी आम्ही नक्कीच सहकार्य करू.
हे ही वाचा:
ज्येष्ठ गीतकार देव कोहली यांचे निधन
चाकरमान्यांना दिलासा; चिपी विमानतळावरून नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होणार
पृथ्वी ते चंद्रापर्यंतच्या अंतरापर्यंतचे रस्ते गावागावांत बनले
शरद पवारांची नवी भूमिका; पक्ष म्हणजे फक्त आमदार नाही तर संघटना
न्या. नीला गोखले, न्या. रेवती मोहिते डेरे, न्या. साधना संजय जाधव, अभिनेते कुणाल रॉय कपूर आणि मकरंद देशपांडे, रैल पदमसी, लुशीन दुबे, असद लालजी, नीरज बजाज, मीनल बजाज, नंदिता पुरी, अरविंद गौर, अनुपमा वर्मा, उमा डकुन्हा, कैलाश सुरेंद्रनाथ, आरती सुरेंद्रनाथ, पूनम सोनी, रॉजर परेरा हे मान्यवर उपस्थित होते.