‘राणा’ तुला अखेरचा सलाम; तुझे उपकार विसरता येणार नाहीत

पोटात आलेल्या गाठीमुळे अखेर सोडला प्राण

‘राणा’ तुला अखेरचा सलाम; तुझे उपकार विसरता येणार नाहीत

बॉम्ब शोधक व बॉम्ब नाशक पथकातील लॅब्रोडॉर जातीचा पोलीस श्वान “राणा” वय ७ वर्षे ७ महिने याचे नुकतेच बाई साकराबाई पशु वैद्यकीय रुग्णालय, परळ या ठिकाणी उपचार घेत असतांना निधन झाले आहे.

सदर श्वानास ३ ऑगस्ट २०१५ ते ६ जानेवारी २०१६ पर्यंत (सहा महिने) श्वान प्रशिक्षण केंद्र, गु. अ. वि, मुंबई. शिवाजीनगर, पुणे या ठिकाणी “स्फोटके शोधण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते व तदनंतर दिनांक ७ जानेवारी २०१६ पासून तो बॉम्ब शोधक व नाशक पथकात कार्यरत होता. सदर श्वानाचे देखभालीसाठी श्वान हस्तक म्हणून पो.ना. क्र. ०१.८३६/ तानाजी हनुमंत पवार व पो.ना.क्र.०५.०९८६/सुनिल सत्यवान यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. श्वान “राणा” याने कर्तव्यकाळात बॉम्ब शोधक व नाशक पथकासोबत बॉम्ब कॉल, थ्रेट कॉल, संशयित वस्तू यांची तपासणी करणे, व्हीव्हीआयपी / व्हीआयपी यांचे मुंबई भेटीदरम्यान घातपात विरोधी तपासणी करणे इत्यादी घातपात विरोधी तपासणीमध्ये यशस्वीरित्या सहभाग घेतलेला आहे..

दिनांक २२ जुलै रोजी श्वान “राणा” याचे पोट फुगल्याचे त्याचे हस्तक पो.ना. क्र.०१.०३६ तानाजी हनुमंत पवार व पो.ना. क्र. ०५.०९८६/सुनिल सत्यवान परुळेकर यांचे निदर्शनास आल्याने त्यानी त्यास औषधोपचार करणेकरीता बाई साकराबाई पशु वैदयकिय रुग्णालय, परेल, मुंबई या ठिकाणी घेऊन गेले. सदर ठिकाणी दिनांक ५ ऑगस्टपर्यत बाहयरुग्ण म्हणून त्याच्यावर उपचार सुरु होते. ५ ऑगस्ट रोजी श्वान “राणा” याचे पोट फुगल्याने व त्यास व्यवस्थित नैसर्गिक विधी होत नसल्याने त्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात आंतररुग्ण म्हणून दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्याची सोनोग्राफी केली असता सोनोग्राफी मध्ये त्याच्या पोटात एक गाठ असल्याचे निदर्शनास आले. शस्त्रक्रिया केल्यानंतर सदरची गाठ ही नक्की कशाची आहे हे समजण्या करीता त्याचे नमुने प्राप्त करून परिक्षणाकरीता पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. १२ ऑगस्ट रोजी रक्तातील तपासणी अहवालामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण व प्लेटलेट्स यांची पातळी कमी आढळल्याने शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. त्याचप्रमाणे पोटात असलेली गाठ ही पोटात नेमकी कोणत्या ठिकाणी आहे ? हे समजण्याकरीता स्कॅन तपासणी करण्यात आली. उपचारादरम्यान श्वान ‘राणा’ हा खानपान व औषधोपचारास प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली व त्याच्यावर आंतररुग्ण म्हणून उपचार सुरू असतांना त्याचे १६ ऑगस्ट दरम्यान त्याचे दुख:द निधन झाल्याचे डॉ. आकाश सूर्यवंशी यानी घोषित केले. त्याचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

आता महाराष्ट्रात सीबीआयला दरवाजे खुले?

न्यूयॉर्कमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्यावर दुसरा हल्ला

भाविकांच्या दानधर्मातून श्रीकृष्णासाठी २५ लाखांचा पाळणा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनाही भर्ती व्हायचे होते लष्करात

 

१७ ऑगस्ट रोजी श्वान “राणा” या पोलीस श्वानाचा बाई साकराबाई पशु वैदयकिय रुग्णालय, परेल, मुंबई या ठिकाणी शासकीय इतमामात सन्मान गार्ड मार्फत सलामी देवुन अंत्यविधी करण्यात आला. मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, (प्रशासन), संरक्षण, मुंबई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बॉम्ब शोधक व नाशक पथक, मुंबई व बॉम्ब शोधक व नाशक पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.

Exit mobile version