७०० कर्मचाऱ्यांची विविध पथके, असंख्य सीसीटीव्हीचा तपास, ड्रोनचा वापर, एक आरोपी गजाआड!

पुणे पोलिसांकडून उर्वरीत दोघांचा शोध सुरु

७०० कर्मचाऱ्यांची विविध पथके, असंख्य सीसीटीव्हीचा तपास, ड्रोनचा वापर, एक आरोपी गजाआड!

बोपदेव घाटात ७ दिवसांपूर्वी घडलेल्या अत्याचाराची घटना उघडकीस आणण्यात पुणे पोलिसांना यश मिळाले आहे. या प्रकरणातील एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. उर्वरित दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

पुणे पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलीस, क्राइम ब्रांच, जुन्नर पोलीस ठाण्याचे असे एकूण ७०० पोलीस अधिकारी-कर्मचारी काम करत होते. या प्रकरणाची तपासणी सुरु असताना काल एका संशयित व्यक्तीची माहिती मिळाली, तपास केला असता संशयित व्यक्ती ठिकाणावरून चार-पाच दिवसापासून फरार असल्याचे समजले.

त्यानंतर संपूर्ण खात्रीशीर चौकशी करून एका आरोपीला आज (११ ऑक्टोबर) अटक करण्यात आली. उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरु आहे, त्यासाठी विविध पथके शोध घेत आहेत. तसेच, अशा ठिकाणी पुन्हा घटना घडू नये यासाठी लाईट, सीसीटीव्ही यांसारख्या उपाययोजना पोलीस प्रशासनाकडून घेण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

हे ही वाचा : 

हिज्ब-उत-तहरिर आता दहशतवादी संघटना!

जम्मू काश्मीर निवडणूक तर झाली, पण पाकिस्तानी घुसखोरी भाजपासाठी त्रासदायक!

हैदराबादमध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीची विटंबना

संतापजनक! दुर्गामातेच्या मूर्तीचे हात ग्राइंडिंग मशिनने तोडले!

आरोपींच्या शोधासाठी बरेच दिवस लागले, यावर बोलताना पोलीस अधिकारी म्हणाले, सीसीटीव्हीचा अभाव असल्याने आणि ज्या ठिकाणी सीसीटीव्ही आहेत त्यामार्गांचा वापर टाळत आरोपींनी लहान रस्ते, गल्ली-बोळाचा वापर केला, त्यामुळे शोध घेण्यास वेळ लागला. मार्गिकेच्या शोधासाठी ड्रोनचा वापर देखील करण्यात आला. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरु आहे, उर्वरित दोन आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, आरोपीचे नाव सांगण्यात आले नसून, लवकरच सर्व माहिती दिली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

Exit mobile version