बोरीवली येथे एका ऑटोरिक्षा स्टँड जवळ मिळून आलेल्या १ दिवसाच्या चिमुरडीचे पोलिसांनी पालकतत्व स्वीकारले असून तिच्या भविष्यासाठी एमएचबी पोलिसांनी क्राउड फंडिंग काढून ती रक्कम तिच्या नावावर बँकेत ठेवली जाणार आहे. पोलिसांनी या चिमुरडीचे प्राण तर वाचवलेच त्याच बरोबर तीला मायेची सावली देखील दिली आहे.
५ सप्टेंबरच्या सकाळी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममधून आलेल्या कॉलनंतर एमएचबी कॉलनी पोलिसांनी शिवाजी नगर, बोरिवली पश्चिम येथे एका ऑटो स्टँडवर जवळ धाव घेऊन एक नवजात जिवंत अर्भकाला ताब्यात घेऊन कांदिवलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वसाधारण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.ते अर्भक स्त्री जातीचे असून तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि ती व्यवस्थित असल्याचे सांगण्यात आले, व डॉक्टरांनी तिला दाखल करून घेतले. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात मातापित्यावर गुन्हा दाखल करून त्याचा शोध देखील सुरू केला आहे.
दरम्यान, या चिमुरडीची काळजी व तिच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्याचे महिला सपोउनी शोभा यादव, पोलीस उपनिरीक्षक वनिता काटबाने व इतर पोलीस अधिकारी रुग्णालयात भेट देत आहे. या चिमुरडीचा चांगलाच लळा पोलिसांना लागला आहे.
पोलिसांनी तिला’ एमएचबीची बेटी’ अशी ओळख दिली असून सपोनि.सूर्यकांत पवार यांनी तिचे पालकतत्व स्वीकारले असून तिला हवं नको ते पोलीस पाहात आहे. एमएचबी ची बेटी’च्या भविष्यासाठी पोलीस ठाण्यात क्राउडफंडिंग काढण्यास सुरू केले आहे, त्यातून येणारी रक्कम एमएचबी ची बेटी’ च्या नावाने बँकेत फिक्स डिपॉझिट करण्यात येणार आहे. तिचा शिक्षणाचा सर्व खर्चाची जबाबदारी सपोनि पवार यांनी घेतली आहे. तसेच तिच्यासाठी एक चांगले खाजगी बालगृह शोधून तीला तिथे ठेवण्यात येणार असून तीचा इतर सर्व खर्च पोलीस उचलणार असल्याचे समजते.
हे ही वाचा :
नरबळीसाठी नांदेडमध्ये तरुणाची हत्या झाल्याचा संशय
हिंदूंचा द्वेष करणाऱ्या ख्रिस्ती धर्मगुरूसह राहुल गांधींचा ‘सुसंवाद’
पिंपरीत गायब झालेल्या मुलाची हत्या
सामनाच सांगतोय, संजय राऊत हा विषय संपला…
पोलिसांनी भादवी कलम ३१७ अंतर्गत मुलाला सोडून दिल्याप्रकरणी गुन्हाही नोंदवला आहे. तिचे आई-वडील कॅमेऱ्यात कैद झाले आहेत की नाही हे पाहण्यासाठी ती जिथे सापडली त्या भागातील फुटेजही त्यांनी तपासले, पण काही उपयोग झाला नाही. त्यांनी बाळाची माहिती बाल कल्याण समितीला देखील दिली आहे, समितीने नवजात बालकाला खाजगी निरीक्षण गृहात ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.