जम्मू-काश्मीरच्या उधमपूर येथील पोलीस चौकीवर दहशतवाद्यांचा गोळीबार!

पोलिसांकडून प्रत्युत्तर

जम्मू-काश्मीरच्या उधमपूर येथील पोलीस चौकीवर दहशतवाद्यांचा गोळीबार!

उधमपूरमधील बसंतगड येथील पोलीस चौकीवर काल (१० जुलै) संध्याकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. दोन दिवसांपूर्वी याच भागात प्राणघातक हल्ला केल्या होता, ज्यामध्ये पाच जवान हुतात्मा झाले होते. तथापि, सतर्क पोलीस अधिकाऱ्यांनी तत्काळ प्रत्युत्तर देऊन दहशतवाद्यांना पळ काढण्यास भाग पाडले, त्यामुळे मोठी घटना टळली.

एनडीटीव्हीच्या बातमीनुसार, तीन हल्लेखोर दहशतवादी होते आणि त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रे होती. बसंतगड हे कठुआ जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले आहे. सोमवारी येथे लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात पाच जवान हुतात्मा झाले असून पाच जण जखमी झाले होते. दरम्यान, दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दल आणि पोलिसांकडून परिसरात शोध मोहीम राबवली जात आहे.

हे ही वाचा:

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यास बीसीसीआयचा नकार

रेव्ह पार्टीत सापाचे विष वापरल्याप्रकरणी एल्विश यादवला समन्स

ब्रिटनमध्ये भारतीय वंशाच्या शिवानी राजा यांनी भगवद्गीता हातात घेऊन घेतली खासदारकीची शपथ

बाप दाखव नाही तर श्राद्ध कर…. भूमिका घेताच विरोधक पळाले

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, कठुआ, उधमपूर आणि भदेरवाह येथून सुरू केलेल्या कारवाईत ५० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. घातपाती हल्ल्याप्रकरणी त्याची चौकशी सुरू आहे. जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी आणि त्यांना ठार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. उधमपूर, सांबा, राजौरी आणि पूंछ जिल्ह्यातील घनदाट जंगलात अधिक सुरक्षा दल तैनात करण्यात आले असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Exit mobile version