लालबागचा राजा: पोलिसांची पत्रकारांना धक्काबुक्की

लालबागचा राजा: पोलिसांची पत्रकारांना धक्काबुक्की

गणेशोत्सव सुरु झाल्यापासून पहिल्याच दिवशी लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळातून धक्काबुक्कीचा प्रकार समोर आला आहे. दार वर्षीच लालबागचा राजा मंडळातून भाविकांना धक्काबुक्की झाल्याचे प्रकार समोर येत असतात. पण यावेळी चक्क पत्रकारांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार पुढे आला आहे आणि ती सुद्धा बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांकडून!

लालबागचा राजा गणपतीचे वार्तांकन करायला गेलेल्या पत्रकारांसोबत ही घटना घडली. दर वर्षी लालबागचा राजा मित्रमंडळाच्या गणपतीचे वार्तांकन करायला देशभरताही माध्यमांचे प्रतिनिधी येत असतात. या सर्व पत्रकारांकडे दर्शनाचे पासेस देखील होते. तरीही मंडळाच्या ठिकाणी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसाने त्यानं आत जाण्यापासून रोखले. पत्रकारांनी पासेस दाखवूनही या पोलिसांनी त्यांना आत सोडेल नाही. उलट पत्रकारांवर दादागिरी करू लागले.

हे ही वाचा:

ममतांचा पुन्हा पराभव करायला भाजपाकडून ‘या’ महिलेला उमेदवारी

तालिबानच्या कब्जानंतर राशिद खानचा राजीनामा

चमच्याने बोगदा खणून कैदेतून सुटका

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली

पोलीस निरीक्षक निकम असे या दादागिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या इथे गेलेल्या पत्रकारांवर निकम यांनी अरेरावी केली. त्यांचा व्हिडीओ सध्या माध्यमांमध्ये आणि समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस निरीक्षक निकम हे पत्रकारांना धक्काबुक्की करताना दिसत आहे. ‘हातच काय पायही लावेन’ असे म्हणत या मग्रूर पोलिसाने आपल्या वर्दीचा माज पत्रकारांना दाखवला.

पोलिस निरीक्षक निकमच्या या वागणुकीबद्दल त्यांच्यावर टीकेचा भडीमार होताना दिसत आहे. तर या घटनेमुळे मुंबई पोलिसांच्या कारभारावर पुन्हा ताशेरे ओढले जात आहेत.

Exit mobile version