राज्यात काही दिवसांपूर्वी सत्तांतर झाले आणि शिवसेनेत जी परिस्थिती उद्भवली त्या घटनेचा देखावा कल्याणमधील एका मंडळाने साकारला होता. मात्र, या देखाव्यावर पोलिसांनी त्वरित कारवाई केली असून या मंडळाच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. तसेच तयार करण्यात आलेला हा देखावा पोलिसांनी जप्त केला आहे.
ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये विजय तरुण मंडळाने पक्षनिष्ठा या विषयावर चलचित्र देखावा साकारण्यात आला होता. या देखाव्यात शिवसेना म्हणून एक वृक्ष दाखवण्यात आले होते. पुढे या वृक्षाला फळे लागल्यानंतर ती इतर पक्ष खातात अशा आशयाचा हा देखावा होता. परंतु, या देखाव्यावर कल्याण पोलिसांनी आक्षेप घेतला आणि आज पहाटे या देखाव्यावर कारवाई करत देखाव्याची सामग्री जप्त केली आहे.
हे ही वाचा:
झारखंडमध्ये गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नाही
सर्वोत्कृष्ट मंडळाला मिळणार पाच लाख
जेष्ठ नागरिकांचा ‘त्या’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटणार
या कारवाईबाबत विजय तरुण मंडळाचे ट्रस्टी आणि शिवसेना महानगर प्रमुख विजय साळवी यांनी सांगितले की, मंडळातर्फे प्रत्येक वर्षी महत्वाच्या घडामोडीवर देखावा साकारला जातो. त्याप्रमाणे यंदाही राज्यातील मोठ्या घडामोडीवर देखावा साकारला होता. यंदाच्या देखाव्यात काहीच आक्षेपार्ह नव्हत. पहाटेच्या सुमारास कारवाई केली. ही हिटलरशही आहे असून आम्ही या कारवाई विरोधात न्यायालयात दाद मागणार असून या कारवाईचा निषेध म्हणून आम्ही यंदा गणेश मूर्तीची स्थापना करणार नसल्याचे साळवी यांनी सांगितले. दरम्यान, विजय तरुण मित्र मंडळाचे गणेशोत्सवाचे यंदाचे ५९ वे वर्षाचे आहे.