पोलंडने स्पेनला बरोबरीत रोखले

पोलंडने स्पेनला बरोबरीत रोखले

युरो कप फुटबॉल स्पर्धेचे शनिवारच्या अखेरच्या सामन्यात स्पेन आणि पोलंड हे दोन संघ एकमेकांसमोर आले. अनेक स्टार खेळाडूंचा भरणा असलेला स्पेन संघ विजयाची अपेक्षा ठेवून मैदानात उतरला होता. तर स्पेनला रोखण्याच्या हेतून पोलंड संघ मैदानात उतरला होता. पण या सामन्याचा निकाल अनिर्णित राहिला आहे. दोन्ही संघाकडून एक एक गोल करण्यात आला आणि १-१ असा सामन्याचा अंतिम निकाल ठरला.

शनिवार, १९ जून रोजी युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या स्पेन आणि पोलंड यांच्यात झालेला सामना अत्यंत अटीतटीचा झाला. दोन्ही देश सामना जिंकून गुण खिशात घालण्यासाठी प्रयत्न करताना दिसले. सामन्याच्या २५ व्य मिनिटाला स्पेनला गोल करत आघाडी घेण्यात यश आले. स्पेनचा आघाडीच्या फळीतील खेळाडू अल्वारो मोराटा याने गोल करत स्पेनला १-० ची आघाडी मिळवून दिली.

हे ही वाचा :

सरकारचा अजब कारभार; कोविड सेंटरमध्ये शिकाऊ वैद्यकीय तज्ज्ञ

शिवसेनेचे मुख्यमंत्री, तरी होत नाहीत शिवसेना आमदारांची कामे

लोकांनी तुमच्यासाठी जोडे तयार ठेवलेत!

भाजपाशी जुळवून घ्या…प्रताप म्हणे!

स्पेन संघाला पहिल्या सत्रात ही आघाडी टिकवून ठेवण्यात यशही आले. पण मध्यंतरानंतर पोलंडने सामन्यात बरोबरी साधली. पोलंड संघाचा कर्णधार आणि स्टार खेळाडू रॉबर्ट लेवंडोस्की ह्याने एक अप्रतिम हेडर मारत गोल केला. लेवंडोस्कीच्या या गोलमुळे पोलंड संघाला पराभवाच्या नामुष्कीतून वाचवले.

तर शनिवारी झालेले इतर दोन सामनेही रोमहर्षक झाले. ग्रुप ऑफ डेथ अर्थात सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या ग्रुप एफ मधील चार संघ शनिवारी एकमेकांना भिडले. यामध्ये स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो याच्या पोर्तुगाल संघाला बलाढ्य जर्मनी संघाने ४-२ अशी धुळ चारली आहे. तर दुबळ्या समजल्या जाणाऱ्या हंगेरीने फ्रान्स समोर आव्हान उभे करत सामना १-१ असा अनिर्णित राखण्यात यश मिळवले.

Exit mobile version