‘काँग्रेसच्या मनात विष, राम नावाचा तिरस्कार करते इंडी आघाडी’!

पंतप्रधान मोदींची जोरदार टीका

‘काँग्रेसच्या मनात विष, राम नावाचा तिरस्कार करते इंडी आघाडी’!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज(९ एप्रिल) उत्तरप्रदेश दौऱ्यावर आहेत.पिलीभीत येथे एका विशाल जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, पूर्वीची काँग्रेस सरकारे जगाकडे मदत मागत असत, पण आज भारत जगाला मदत करत आहे.भारतासाठी आज काहीही अशक्य नाही. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिराचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, काँग्रेसचे मन विषाने भरले आहे.इंडिया आघाडीचे लोक राम नावाचा तिरस्कार करत असल्याचे सांगत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर आणि इंडी आघाडीवर जोरदार टीका केली.

लोकसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार जितिन प्रसाद यांच्या समर्थनार्थ निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज जगात भारताचा डंका वाजत आहे.याचे कारण मोदी नाही. हे शक्य झाले ते तुमच्या एका मताने.तुमच्या एका मताने एक मजबूत सरकार बनली.संपूर्ण जगाच्या अडचणींमध्ये भारत आज हे दाखवून देत आहे की आपल्यासाठी काहीही अशक्य नाही. कधीकाळी काँग्रेसची सरकारे जगाकडे मदत मागायची, पण कोरोनाच्या संकटात भारताने संपूर्ण जगाला औषधे आणि लस पाठवली.जगात जिथे जिथे युद्ध संकट आले, आम्ही एक-एक भारतीयाला सुखरूप परत आणले.अफगाणिस्तानातून गुरुग्रंथ साहिब यांचे धर्मग्रंथ पूर्ण श्रद्धेने भारतात आणले आणि हे सर्व तुमच्या एका मताच्या ताकदीने घडले आहे.

हे ही वाचा:

काँग्रेसची गळती कायम ; प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिवसेना प्रवेश

‘अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे, होता आणि राहील’

‘अनिल मसिह यांना विचारू, असे का केले?’

एलन मस्क यांनी टाकले मार्क झुकेरबर्गला मागे!

ते पुढे म्हणाले, आमच्या कल्याण सिंहजींनी आपले जीवन आणि सरकार राम मंदिरासाठी समर्पित केले. देशातील प्रत्येक कुटुंबाने आप-आपल्या श्रद्धेने योगदान दिले.पण इंडी आघाडीच्या लोकांमध्ये राम मंदिर उभारणीपूर्वीही द्वेष होता आणि आजही द्वेष आहे. अयोध्येत राम मंदिर बनू नये यासाठी काँग्रेसने खूप प्रयत्न केले, पण जेव्हा देशातील जनतेने एक एक पैसे देऊन एवढे भव्य मंदिर उभारले आणि तुमची सर्व पापे माफ करून तुम्हाला मंदिराकडून प्राणप्रतिष्ठेसाठी आमंत्रित करण्यात आले. पण तुम्ही (काँग्रेस) निमंत्रण नाकारून प्रभू रामाचा अपमान केला आणि प्राणप्रतिष्ठेला गेलेल्या नेत्यांची पक्षातून ६ वर्षांसाठी हकालपट्टी केली.

 

Exit mobile version