पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ एप्रिलला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ७१ हजार तरुणांना सरकारी नोकऱ्यांची नियुक्तीपत्रे सुपूर्द करणार आहेत. या सरकारी नोकऱ्यांमध्ये एकट्या रेल्वे विभागातील ५० हजार रिक्त पदांचा समावेश आहे. . या वर्षअखेरीस १० लाख सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिले आहे. त्यानुसार सरकारने आतापर्यंत १.४६ लाख तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले आहे.
या वर्षाच्या अखेरीस उर्वरित ७.८३लाख रिक्त पदे भरण्याची सरकारची योजना आहे. रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमादरम्यान सरकारचे अनेक मंत्री देशातील ४५ वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या सरकारी मेळ्यात सहभागी होणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव जयपूर,अर्थमंत्री निर्मला सीतारामन चेन्नई, जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत जोधपूर, अवजड उद्योग मंत्री महेंद्र पांडे लखनौ अर्जुन मुंडा रांची, नितीन गडकरी नागपूर, धर्मेंद्र प्रधान भुवनेश्वर, हरदीप सिंग पुरी उपस्थित राहणार आहेत.
जानेवारी महिन्यात ७१ हजार युवकांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. तिसऱ्या रोजगार मेळाव्यानंतर नियुक्तीपत्रे मिळणाऱ्यांची संख्या २.१७ लाख असेल. ज्या मंत्रालयांमध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत त्यांच्या संपर्कात पंतप्रधान कार्यालय आहे. मोदी सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ७५ हजार तर यावर्षी जानेवारी महिन्यात ७१ हजार तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले आहे. तिसऱ्या रोजगार मेळाव्यानंतर नियुक्तीपत्रे मिळणाऱ्यांची संख्या २.१७ लाख असेल. ज्या मंत्रालयांमध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत त्यांच्या संपर्कात पंतप्रधान कार्यालय आहे.
हे ही वाचा:
कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे भाजपाचे वटवृक्षात रूपांतर
नायजेरियात बंदुकधाऱ्याने गोळीबार करून मारले ५० जणांना
भाजपा सरकार पुरस्कार देईल असे वाटले नव्हते, पण मोदीजी तुम्ही मला चुकीचे ठरवलेत!
काँग्रेस नेते ए.के. अँटनींचे चिरंजीव अनिल अँटनीनी धरला भाजपाचा हात
याआधी जानेवारी महिन्यामध्ये १० लाख कर्मचाऱ्यांसाठी झालेल्या भरती मोहिमेंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे ७१ हजार तरुणांना रोजगार मेळाव्यात नियुक्ती पत्रे दिली होती. ज्युनिअर इंजिनीअर, लोको पायलट, तंत्रज्ञ, निरीक्षक, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, स्टेनोग्राफर, कनिष्ठ लेखापाल, ग्रामीण डाक सेवक, आयकर निरीक्षक, शिक्षक, नर्स, डॉक्टर अशा विविध पदांसाठी ही नियुक्ती करण्यात आली होती.