पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१५ सप्टेंबर) झारखंडच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी झारखंडला वंदे भारत ट्रेन भेट दिली. पंतप्रधान मोदींनी जमशेदपूरमधून ऑनलाईनद्वारे सहा वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यानंतर पंतप्रधान मोदींनी ऑनलाईनद्वारे जाहीर सभेला संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी झारखंडला कर्मपूजेच्या शुभेच्छा दिल्या. तसेच पंतप्रधान मोदींनी झारखंडमधील देवघर जिल्ह्यातील मधुपूर बायपास लाइन आणि हजारीबाग जिल्ह्यातील हजारीबाग टाउन कोचिंग डेपोची पायाभरणीही केली.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज झारखंडला विकासाचा नवा आशीर्वाद मिळाला आहे. सहा नवीन वंदे भारत रेल्वे, ६५० कोटींहून अधिक किमतीचे रेल्वे प्रकल्प, कनेक्टीविटी आणि प्रवासी सुविधांचा विस्तार, यासह झारखंडच्या लोकांना पीएम आवस योजने अंतर्गत पक्के घर मिळणार आहेत, सर्व विकास कार्यांसाठी माझाकडून झारखंडच्या लोकांना शुभेच्छा, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदींकडून हिरवा झेंडा दाखवण्यात आलेल्या सहा वंदे भारत एक्स्प्रेस टाटानगर-पाटणा, भागलपूर – दुमका – हावडा, ब्रह्मपूर – टाटानगर, गया – हावडा, देवघर- वाराणसी, राउरकेला – हावडा, या मार्गांवर धावणार आहेत.
हे ही वाचा :
केजारीवालांना उपरती, देणार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा !
राजस्थानच्या जहाजपुरमध्ये हिंदूंच्या मिरवणुकीवर मुस्लीम समुदायाकडून दगडफेक
राजगुरूनगरमध्ये एकवटला सकल हिंदू समाज
सत्ता आल्यास एक तासात दारूबंदी रद्द करणार
दरम्यान, या वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या सुरू झाल्याने नियमित प्रवासी, कामगार, व्यापारी आणि विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. या गाड्या देवघरमधील बैद्यनाथ धाम, वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर, कोलकातामधील कालीघाट, बेलूर मठ इत्यादी तीर्थक्षेत्रांना जलद वाहतूक उपलब्ध करून देऊन धार्मिक पर्यटनाला चालना देतील. याशिवाय धनबादमधील कोळसा खाण उद्योग, कोलकाता येथील ज्यूट उद्योग, दुर्गापूरमधील लोह आणि पोलाद संबंधित उद्योगांनाही मोठी चालना मिळणार आहे.