27 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरविशेषसंयुक्त राष्ट्र संघात मोदी रचणार इतिहास

संयुक्त राष्ट्र संघात मोदी रचणार इतिहास

Google News Follow

Related

भारताने आज पासून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. याबद्दल रशियाकडून भारताचे अभिनंदन करण्यात आले. जागतिक प्रश्नांना महत्त्व देण्याच्या आणि नाविक शांतते बरोबरच दहशतवाद विरोधाला प्राधान्य देण्याच्या भारताच्या भूमिकेमुळे प्रभावित झाले असल्याचे रशियाकडून सांगण्यात आले आहे. भारताने आज संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारल्यानंतर रशियाच्या राजदूताकडून अभिनंदनपर ट्विट करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (यूएनएससी) बैठकीचे अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. असं करणारे ते देशाचे पहिलेच पंतप्रधान असणार आहेत. अशी माहिती संयुक्त राष्ट्रातील भारताचे माजी स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरूद्दीन यांनी सांगितलं आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील भारताचा हा आठवा कार्यकाळ असून या बैठकीचे अध्यक्षपद स्वीकारण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची बैठक संपूर्ण ऑगस्ट महिन्यापर्यंत चालणार आहे.

संयुक्त राष्ट्रातील भारताचे माजी स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरूद्दीन यांनी सांगितलं की, भारताच्या ७५ वर्षांच्या इतिहासातील एखाद्या राजकीय नेत्याने, पंतप्रधानांने अशा प्रकारचे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारणे ही पहिलीच गोष्ट आहे. भारताच्या स्वातंत्र्याला या वर्षी ७५ वर्षे होणार असून अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकरणार हा दुग्धशर्करा योग आहे.

संयुक्त राष्ट्राच्या नियमांनुसार, सुरक्षा परिषदेतील स्थायी आणि अस्थायी सदस्य राष्ट्रांना क्रमाने अध्यक्षपद दिले जाते. भारत सध्या संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिदषेचा अस्थायी सदस्य देश असून या वेळचे अध्यक्षपद भारताच्या पारड्यात पडलं आहे. त्यामुळे सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे. भारतीय पंतप्रधान व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या बैठकीचे अध्यक्षपद सांभाळतील तर देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि परराष्ट्र सचिव श्रृंगला हे न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या बैठकीत उपस्थित असतील.

हे ही वाचा:

झिका का आला पुण्यात?

महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती संदर्भात मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले पत्र

लखनऊमधील मंदिरे बॉंम्बने उडवण्याची निनावी धमकी

आजपासून भारत सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षस्थानी

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत अशा प्रकारे राजकीय नेतृत्वाने सक्रिय भूमिका घेणं हे सकारात्मक आहे, ते फ्रन्टलाईनवर येऊन त्याने काम करणे यातून एक सकारात्मक संदेश जात असल्याचं संयुक्त राष्ट्रातील भारताचे माजी स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरूद्दीन यांनी सांगितलं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा