पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या दौऱ्यदरम्यान किंवा इतर वेळीही सातत्याने सामान्य माणसांमध्ये मिसळत असतात. त्यांच्याशी शक्य तेवढं बोलत असतात. त्यांच्या समस्या जाणून घेत असतात. नागरिकांनी प्रेमापोटी केलेल्या प्रत्येक कामाची, त्यांच्या मेहनतीची दखल घेत असतात. नरेंद्र मोदी यांचे लहान मुलांवरील प्रेम तर सातत्याने समोर येत असतं. याची पुन्हा एकदा प्रचिती महाराष्ट्रातल्या चिमुरडीला आली आहे.
महाराष्ट्रातील परभणीच्या गंगाखेडमधील ओजस्वी गोपाळ मंत्री या लहानगीचा पहिला वाढदिवस १७ सप्टेंबरला होता. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही वाढदिवस याच दिवशी असतो. या निमित्ताने ओजस्वी हीचे वडील गोपाळ मंत्री यांनी त्यांच्या मुलीला पंतप्रधानांचे आशीर्वाद मिळावे यासाठी त्यांना भेटण्याची वेळ मागितली. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधान कार्यालयाकडून त्यांना वेळ देण्यात आली नाही. त्यामुळे त्या दिवशी ओजस्वीला घेऊन तिच्या कुटुंबियांना पंतप्रधनांना भेटता आले नाही.
मात्र, अचानक त्यांच्या घरी थेट दिल्लीहून पंतप्रधान मोदी यांच्याकडून पत्र आलं. हे पत्र पोस्टाने मंत्री कुटुंबियांच्या हाती लागताच त्यांचा आनंद गगनात मावला नाही. कारण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या जेमतेम एक वर्षाच्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्या याचे कौतुक या कुटुंबाला होतं.
हे ही वाचा:
‘ज्यांना दूध पाजले म्हणता त्या शिवसैनिकांचा त्याग, मेहनत आहे पक्षवाढीत’
‘मालाडची स्मशानभूमी तोडलीत; मढचे स्टुडिओ का तोडले नाहीत?’
दसरा मेळाव्याला कुणालाही परवानगी नाही
एबीजी शिपयार्डचे माजी सीएमडी ऋषी अग्रवाल यांना अटक
या पत्रात नरेंद्र मोदींनी ओजस्वी हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच त्यांनी ओजस्वी हिला तिच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले आहेत.