पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर्नाटक दौऱ्यावर आहेत. तिथे ते बंदीपूर व्याघ्र प्रकल्पाला भेट देत आहेत. प्रोजेक्ट टायगर या योजनेला ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पंतप्रधानांची ही भेट आहे. यानिमित्त विशेष अशा वेशभूषेत पंतप्रधान व्याघ्र प्रकल्प पाहण्यासाठी दाखल झाले आहेत. या भेटीदरम्यान वाघांची संख्या ते जाहीर करणार आहेत.
५० वर्षे हा प्रकल्प सुरू असताना वाघांची संख्याही वाढू लागली आहे. काळी हॅट, मातकट रंगाचे जॅकेट आणि तशीच पॅन्ट असा पंतप्रधानांचा हा विशेष असा वेश या भेटीसाठी आहे. पंतप्रधानांनी थेप्पकडू हत्ती प्रोजेक्टलाही भेट दिली तिथे त्यांनी हत्तींना उस खायला घातला. हत्तींच्या या कॅम्पमध्ये ते गेले. तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
हे ही वाचा:
इम्रान खान यांच्या तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणावर १२ एप्रिलला सुनावणी
शेअर बाजारातल्याअव्वल १० पैकी ८ कंपन्यांच्या बाजार भांडवलात ८२,१६९ कोटी रुपयांनी वाढ
तीन पत्तीचा डाव संपला, आता पोकर सुरू…
विरोधकांच्या प्रयत्नांवर अजित पवारांचा बोळा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बंदीपूर व्याघ्र प्रकल्पाला भेट देणारे पहिले पंतप्रधान आहेत. भारतातील पहिल्या क्रमांकाचे व्याघ्र प्रकल्प म्हणून बंदीपूरची गणना होते. काही महिन्यांपूर्वी नामिबियातून मागविलेल्या चित्त्यांना कुनो अभयारण्यात सोडण्यात आले तेव्हा पंतप्रधानांच्या उपस्थितीत तो कार्यक्रम पार पडला होता. पंतप्रधानांनी त्या चित्त्यांचे फोटोही काढले. अशाच पद्धतीने बंदीपूरमध्येही पंतप्रधान कॅमेऱ्याच्या सहाय्याने प्राण्यांची छायाचित्रे टिपताना दिसले. तसेच दुर्बिणीच्या सहाय्याने त्यांनी जंगलाची माहितीही घेतली.