देशातील हावडा-पुरी ही १७ वी वंदे भारत एक्सप्रेस

देशातील १७ वी तर ओडिसातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन

देशातील हावडा-पुरी ही १७ वी वंदे भारत एक्सप्रेस

हावडा ते पुरी दरम्यान आज १७ वी वंदे भारत एक्सप्रेस आजपासून धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हावडा-पुरी वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ओडिशाला आज पहिली वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. त्याचबरोबर आगामी काळात आणखी अनेक मार्गांवर वंदे भारत सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये मुंबई ते गोवा, रांची ते पाटणा, गुवाहाटी ते न्यू जलपाईगुडी, दिल्ली ते डेहराडून यांचा समावेश असणार आहे.

हावडा-पुरी वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. यामुळे हावडा ते पुरी हा प्रवास अवघ्या ६ ते ६.३० तासात पूर्ण करता येणार आहे. हावडा ते पुरी दरम्यान धावणाऱ्या या वंदे भारत ट्रेनचा वेग ताशी १३० किलोमीटर असणार आहे. ट्रेन नंबर ०२८९६ (पुरी-हावडा) वंदे भारत ट्रेन आजपासून मोठ्या दिमाखात रवाना होईल. या गाडीला १६ डबे असणार आहे. यामध्ये टीसी-४, एमसी-८, डीटीसी-२ आणि एनडीटीसी-२ डबे असणार आहेत.

ही वाचा :

इम्रान खान यांना पुन्हा अटकेची भीती!

तापमान; दर पाच वर्षांनी विक्रमी उष्णतेच्या लाटा !

इम्रान खान यांना पुन्हा अटकेची भीती!

तापमान; दर पाच वर्षांनी विक्रमी उष्णतेच्या लाटा !

वंदे भारत ट्रेन सेमी हाय स्पीड ट्रेन म्हणून ओळखली जाते. सरकारने आतापर्यंत १५ राज्यांना ही भेट दिली आहे. यामध्ये गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, तामिळनाडू, छत्तीसगड, राजस्थान आणि हरयाणा यांचा समावेश आहे. भारतीय रेल्वेला वंदे भारत एक्स्प्रेस देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायची आहे. मोदी सरकारने तीन वर्षांत ४०० वंदे भारत गाड्या सुरू करण्याची योजना आखली आहे.

Exit mobile version