आज, १ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5G शुभारंभ झाला. यावेळी त्यांनी फक्त उद्घाटन केले नसून या सेवेचा अनुभवही घेतला आहे. नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर बसून पंतप्रधान मोदींनी 5G तंत्रज्ञानाच्या मदतीने युरोपमध्ये कार चालवली. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी पंतप्रधान मोदींचा फोटो ट्विट करत ‘भारत जग चालवत आहे’ असे लिहिले आहे.
5G चे प्रक्षेपण झाल्यानंतर नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथील जिओ पॅव्हेलियनमध्ये प्रदर्शित केलेली 5G उपकरणांबद्दल जाणून घेतले. यावेळी पंतप्रधान मोदींनी ‘जिओ-ग्लास’चा अनुभवही घेतला आहे. यावेळी मोदींनी जिओच्या अभियंत्यांकडून 5G तंत्रज्ञानाच्या विकासाबद्दल माहिती जाणून घेतली. यावेळी पंतप्रधानांसह दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव, दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान, रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी हेही उपस्थित होते.
India driving the world.
PM @NarendraModi ji tests driving a car in Europe remotely from Delhi using India’s 5G technology. pic.twitter.com/5ixscozKtg
— Piyush Goyal (@PiyushGoyal) October 1, 2022
पंतप्रधान मोदींनी ऑटोमेटेड गाईडेड व्हेईकलचीही चाचणी घेतली आहे. दिल्लीतील सहाव्या इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये पंतप्रधान एरिक्सन पॅव्हेलियनमध्ये होते. युरोपमध्ये बंद इनडोअर कोर्समध्ये नेव्हिगेट करण्यासाठी या वाहनाची स्थापना करण्यात आली होती. पीएम मोदींनी आयएमसी येथील एरिक्सन स्टॉलवर नियंत्रणाद्वारे वाहन नियंत्रित केले. यासोबतच पंतप्रधानांनी 5G सेवेच्या मदतीने शाळकरी मुलांशीही संवाद साधला. यावेळी मुलांनी आपले अनुभव सांगितले.
हे ही वाचा:
काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खरगेंचे पारडे जड
“5G नेटवर्कमुळे भारतातील टेलिकॉम क्षेत्रात मोठे बदल घडणार”
कांदिवलीत झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू
याप्रकरणी छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल
दरम्यान, भारतात इंटरनेट क्रांतीची सुरुवात १९९५ मध्ये 2G सेवा सुरू झाल्यापासून झाली. देशाला 2G ते 3G पर्यंतचा प्रवास करण्यासाठी चौदा वर्षे लागली. 3G सेवा २००९ मध्ये सुरू झाली. पुढे २०१२ मध्ये 4G सेवा सुरू झाली आणि आता २०२२ मध्ये 5G सेवा लाँच करण्यात आली आहे.