गुलामीचा अंश मिटवूया; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिले पाच संकल्प

भारत आपल्या स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी करत आहे. यावेळी नरेंद्र मोदी यांनी जनतेला ‘पंचसंकल्प’ दिले आहेत.

गुलामीचा अंश मिटवूया; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिले पाच संकल्प

भारत आपल्या स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी करत आहे. लाल किल्ल्यावर पोहोचण्याआधी नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले आणि जनतेला संबोधन केलं.

यावेळी नरेंद्र मोदी यांनी जनतेला ‘पंचसंकल्प’ दिले आहेत. पहिला संकल्प म्हणजे विकसित भारत. आपल्या सर्वांना विकसित भारताचे स्वप्न पाहावे लागेल. दुसरा संकल्प म्हणजे गुलामीचा अंश मिटवण्याचा. मनात गुलामीचा अंश असेल तर त्याला बाहेर काढायचे आहे. गुलामीचा एकही अंश भारतातील कोणत्याही भागात नाही. तसेच यापुढेही तो राहता कामा नये. शेकडो वर्षातील गुलामीला नष्ट करायची आहे.  आपल्याला थोडीजरी गुलामी दिसत असेल तर आपल्याला या गुलामीपासून मुक्ती मिळवावी लागेल.

नरेंद्र मोदी यांनी तिसरा संकल्प दिला तो म्हणजे आपल्या वारशाविषयी आपल्याला अभिमान हवा. आपल्या वारशाप्रती आपल्याला गर्व असायला हवा. आपल्याला आपला वारसा जपायचा आहे. यानंतर चौथा संकल्प नरेंद्र मोदींनी दिला तो एकता आणि एकजुटीचा. भारतासाठी एकता महत्त्वाची आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तर नागरिकांचे कर्तव्य हा पाचवा संकल्प आहे आणि नागरिकांच्या कर्तव्यामध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचादेखील समावेश होतो, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

हे ही वाचा:

विनायक मेटे अपघात प्रकरणी ट्रक ड्रायव्हरला अटक

तुरुंगात असलेल्या मालिकांच्या अडचणीत वाढ, समीर वानखेडेंनी नोंदवला एफआयआर

स्टॉक मार्केटमधील ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन

भाषणापूर्वी नरेंद्र मोदी यांनी जगभरातील तमाम भारतीयांना आणि भारताप्रती प्रेम असणाऱ्या सर्वांना अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी भारताच्या विकासाचा प्रवास जनतेसमोर मांडला. भारताची विविधता हीच आपली अनमोल शक्ती असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. भारतावर अनेक संकटं आली पण भारत पुढे चालत राहिला, असेही ते म्हणाले. भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलला असून आज जग भारताकडे गर्वाने आणि अपेक्षेने पाहत आहे, असेही नरेंद्र म्हणाले.

Exit mobile version