नीतिश कुमारांना मोदींचा टोला; आणखी किती खाली घसरणार?

मध्य प्रदेशातील सभेत मोदींनी केली टीका

नीतिश कुमारांना मोदींचा टोला; आणखी किती खाली घसरणार?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मध्य प्रदेशातील गुना येथील रॅलीला संबोधित करताना बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. नीतिशकुमार यांनी महिलांच्या बाबतीत केलेल्या विधानावर विरोधक मात्र गप्प बसले आहेत, असेही मोदी म्हणाले.

अशा प्रकारची वक्तव्ये ही देशातील महिलावर्गाला अपमानित करणारी असतात, असे म्हणत मोदींनी सांगितले की, इंडी आघाडीतील एक मोठे नेते बिहारमधील महिलांप्रती घाणेरड्या शब्दांचा वापर करतात. पण त्यांना त्याची लाजही वाटत नाही. शिवाय, इंडी आघाडीतील एकही नेता त्यावर काही बोलत नाही. जे लोक महिलांप्रती अशा शब्दांचा वापर करतात ते तुमचे कधी भले करू शकतात का? आपल्या माताभगिनींसाठी जे असा दृष्टिकोन बाळगतात ते आपल्या देशाला नावे ठेवतात. असे नेते आणखी किती खाली घसरणार आहेत.

हे ही वााचा :

शालेय पोषण आहारात आता आठवड्यातून एकदा अंडी आणि केळी

भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरांच्या मागे लागणार मधमाशा!

एल्विश यादव प्रकरणाच्या वैदकीय अहवालात धक्कादायक माहिती समोर!

अमेरिकेच्या अर्थसहाय्याने अदानी समूह श्रीलंकेत उभारणार बंदर, चीनची कोंडी

मंगळवारी नीतिश कुमार यांनी महिलांप्रती केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली होती. लोकसंख्या नियंत्रणासाठी महिलांच्या शिक्षणाची गरज आहे, असे नीतिश कुमार म्हणाले होते. अर्थात, या विधानावर नंतर नीतिशकुमार यांनी माफीही मागितली. यावर भाजपाच्या नेत्यांनी नीतिशकुमार यांच्यावर टीका केली होती. राज्य सरकारने जातीनिहाय सर्वेक्षण अहवाल जारी केल्यानंतर त्यांनी हे भाष्य केले होते.

Exit mobile version