पंतप्रधान मोदी यांनी केले आवाहन
भारत स्वातंत्र्याची ७५ वर्ष साजरे करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरून भारतीयांना संबोधित केले आहे. यावेळी त्यांनी जनतेला ‘पंचसंकल्प’ दिले. यातील चौथा संकल्प म्हणजेच एकता आणि एकजूट याविषयी बोलताना नरेंद्र मोदी यांनी लिंग समानतावर भाष्य केले. भारतामध्ये विविधता आहे आणि ते आपण साजरं करायला हवं. पण एकतामध्ये समानतेचे भाव असायला हवेत.
घरातही मुलगा आणि मुलगी यांना समान वागणूक दिली तरच एकता या मूल्याच पालन होईल. मुलगा आणि मुलगी हे एकसमान नसतील तर एकता या मूल्याला महत्त्वचं नाही, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, “कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्यामध्ये अशी एक विकृती आली आहे की आपल्या बोलण्यातून, वागण्यातून, शब्दांमधून आपण महिलांचा अपमान करत आहोत. पण आपण स्वाभावाने, संस्काराने रोजच्या आयुष्यात होणाऱ्या महिलांच्या अपमानाच्या घटनांना आणि अशा गोष्टींपासून मुक्ती मिळवण्याचा संकल्प घेऊ शकतो,” असे आवाहन त्यांनी केलं आहे.
महिलांचा गौरव करणं हे आपलं राष्ट्रीय स्वप्न पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. महिलांचा आदर करण्यासाठी आग्रही असल्याचंही नरेंद्र मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
गुलामीचा अंश मिटवूया; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिले पाच संकल्प
विनायक मेटे अपघात प्रकरणी ट्रक ड्रायव्हरला अटक
तुरुंगात असलेल्या मालिकांच्या अडचणीत वाढ, समीर वानखेडेंनी नोंदवला एफआयआर
स्टॉक मार्केटमधील ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन
यंदाच्या वर्षी नरेंद्र मोदी यांनी जनतेला ‘पंचसंकल्प’ दिले आहेत. पहिला संकल्प म्हणजे विकसित भारत. दुसरा संकल्प म्हणजे गुलामीचा अंश मिटवण्याचा. नरेंद्र मोदी यांनी तिसरा संकल्प दिला तो म्हणजे आपल्या वारशाविषयी आपल्याला अभिमान हवा. यानंतर चौथा संकल्प नरेंद्र मोदींनी दिला तो एकता आणि एकजुटीचा आणि नागरिकांचे कर्तव्य हा पाचवा संकल्प आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.