२०२३ वर्ष आशेचे, आनंदाचे आणि भरपूर यशाचे जावो

पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा

२०२३ वर्ष आशेचे, आनंदाचे आणि भरपूर यशाचे जावो

देशभरात नवीन वर्षाचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे.  जल्लोषात आतषबाजी करण्यात आली. सर्वजण नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांना  नवीन वर्ष २०२३ साठी शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू , उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह अनेक नेत्यांनीहि शुभेच्छा दिल्या आहेत. “२०२३हे वर्ष तुमच्यासाठी अप्रतिम जावो! ते आशा, आनंद आणि भरपूर यशाने भरलेले जावो. सर्वांना चांगले आरोग्य लाभो.” अशी मनोकामना पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये केली आहे.

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज सकाळी त्यांनी ट्विट केले, ” २०२३ हे वर्ष आपल्या जीवनात नवीन प्रेरणा, ध्येये आणि यश घेऊन येवो. देशाची एकता, अखंडता आणि सर्वसमावेशक विकासासाठी स्वतःला झोकून देण्याचा संकल्प करूया. असे राष्ट्रपती मुर्मू यांनी म्हटले आहे.

 

 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही ट्विट करून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले, “२०२३ वर्षासाठी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा! प्रभू श्री रामाच्या कृपेने हे नवीन वर्ष तुमच्या जीवनात आनंद, समृद्धी, शुभेच्छा, उत्साह आणि आरोग्य घेऊन येवो.”

 

 

हे ही वाचा: निर्दयी कोण शिंदे की उद्धव ठाकरे? स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राडा का करतायत? ब्राझिलचे महान फुटबॉलपटू, तीनवेळा विश्वविजेते ठरलेले पेले कालवश स्थायी समिती अध्यक्षांचा वचपा?

 

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही ट्विट करून नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिले, ‘नवीन वर्षाच्या निमित्ताने राज्य आणि देशवासीयांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचे, शांती, भरभराटीचे, समरसतेचे आणि अनंत यशाचे जावो. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून सुखी, समृद्ध आणि वैभवशाली बिहार घडवण्याचा संकल्प पूर्ण होईल.

 

Exit mobile version