पुढील महिन्यात २३ जुलैपासून टोकियो ऑलिम्पिकला प्रारंभ होत आहे. त्यानिमित्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये बोलताना ऑलिम्पिकला जाणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन दिले. त्यावेळी महाराष्ट्राच्या साताऱ्यातील सराडे गावच्या प्रवीण जाधव या तिरंदाजाचीही त्यांनी आवर्जून दखल घेतली. प्रवीण जाधव महाराष्ट्र साताऱ्याचा तिरंदाज मोठा संघर्ष करत आता ऑलिम्पिकपर्यंत पोहोचला आहे. ‘प्रवीण हा तिरंदाजीतील उत्तम खेळाडू. त्याचे आईवडील मजुरी करून आपल्या कुटुंबाचे पोट भरतात. तो प्रथमच ऑलिम्पिकला जात आहे. त्याचे कौतुक.’ अशा शब्दांत मोदींनी त्याला शाबासकी दिली.
हे ही वाचा:
पुदुचेरीला मिळाली पहिली महिला मंत्री
‘वाघ आमच्या इशाऱ्यावर चालतो’…वडेट्टीवार शिवसेनेवर गुरगुरले
शिक्षण विभागात रिक्त पदे भरणार कधी?
‘बेस्ट’वर एसटीचा ७० कोटींचा भार
स्वत: पंतप्रधान मोदी यांनी दखल घेतलेला २४ वर्षीय प्रवीण जाधव आघाडीचा तिरंदाज आहे. प्रवीण साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील छोट्याशा सराडे गावचा राहणारा. त्याचे वडील रमेश आणि आई दररोज मजुरी करुन आपले कुटुंब चालवतात. प्रारंभी, तो ८०० मीटर धावत असे. पण त्यात पुरेशा फिटनेसअभावी त्याला यश मिळाले नाही. नंतर शालेय वयात क्रीडा शिक्षक विकास भुजबळ यांनी त्याला तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन दिले. पुढे वयाच्या १२ व्या वर्षी त्याला अहमदनगर जिल्ह्यातील क्रिडा प्रबोधिनीत तिरंदाजीची निवड केली.
पंतप्रधानांनी यावेळी महिला हॉकीची सदस्य नेहा गोयलचीही दखल घेतली. तिची आई आणि बहिणी सायकल कंपनीत काम करून पोट भरत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. दीपिका कुमारीनेही संघर्ष करत अव्वलस्थान मिळविल्याचे ते म्हणाले. उत्तर प्रदेशची चालण्याच्या स्पर्धेतील खेळाडू प्रियांका गोस्वामीचे जीवनही खूप काही शिकवून जाणारे आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. भालाफेकपटू शिवपाल सिंगचे तर संपूर्ण कुटुंब भालाफेकमध्ये रंगले आहे असे सांगत पंतप्रधानांनी बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी आणि सात्त्विक साईराज यांचेही कौतुक केले. हरयाणाचा बॉक्सर मनीष कौशिक, चेन्नईची तलवारबाज भवानी,
पंतप्रधान पुढे म्हणाले की, टोकियोला चाललेल्या प्रत्येक खेळाडूचे आम्हाला कौतुक आहे. हे खेळाडू देशासाठी चालले आहेत. या खेळाडूंना लोकांची मने जिंकायची आहेत. त्यासाठी आपण या खेळाडूंवर दबाव न टाकता त्याच्या पाठीशी उभे राहायचे आहे. #CHEER4INDIA या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन द्या, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.