पंतप्रधान मोदींचे पुन्हा हर हर महादेव

अनेक प्रकल्पांची पायाभरणी केली

पंतप्रधान मोदींचे पुन्हा हर हर महादेव

आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहेत. सर्वप्रथम पंतप्रधान मोदींनी केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे. तसेच आज दुपारी ते एकाच वेळी अनेक प्रकल्पांची पायाभरणीही करणार आहेत.

पंतप्रधान मोदी दोन दिवसीय उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींची सुरक्षा लक्षात घेऊन उत्तराखंडमध्ये विविध ठिकाणी सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. आज, २१ ऑक्टोबर रोजी सकाळी साडे आठ वाजता पंतप्रधान मोदींनी केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन आणि पूजा केली. त्यानंतर ९ वाजता गौरीकुंड केदारनाथ आणि गोविंदघाट ते हेमकुंड साहिब यांना जोडणाऱ्या दोन नवीन रोपवे प्रकल्पांची पंतप्रधान पायाभरणी केली आहे. केदारनाथ रोपवे प्रकल्पाच्या पायाभरणीनंतर पंतप्रधान मोदी आदिगुरू शंकराचार्यांच्या समाधीला भेट दिली आहे. त्यानंतर त्यांनी बद्रीनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे.

यावेळी पंतप्रधान दर्शनाला आले असता पुजारी आणि तेथे उपस्थित भाविक देखील उत्साहात होते. केदारनाथ आणि बद्रीनाथ दोन्ही मंदिरे सुंदर फुलांनी सजलेली आहेत. पंतप्रधान मोदींनी आज पहिल्यांदा मंदिरात पूजा केली आहे.
पायाभरणी केलेला रोपवे सुमारे ९.७ किलोमीटर लांब असणार आहे. हा रोपवे गौरीकुंड आणि केदारनाथला जोडला जाणार असून, दोन ठिकाणांमधला प्रवासाचा वेळ सध्याच्या सहा ते सात तासांवरून तीस मिनिटांपर्यंत कमी होईल. हा रोपवे घंगारियाला देखील जोडणार आहे, जे व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्कचे प्रवेशद्वार आहे. उत्तराखंडची जनता कधीपासून या प्रकल्पांची वाट पाहत होती.अखेर पंतप्रधान मोदींनी या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आहे.

हे ही वाचा:

एमसीए निवडणुकीत राजकारणी जिंकणार की संदीप पाटील?

अजित वाडेकर, दिलीप वेंगसरकरनंतर संदीप पाटीलही ‘आऊट’, अमोल काळे एमसीएचे अध्यक्ष

बिपिन फुटबॉल अकादमीच्या शिबिरात मुले रंगली

काठमांडूनंतर आता गुजरात भूकंपाने हादरला

दरम्यान, गेल्या वर्षात ४१ लाख यात्रेकरूंनी चारधामचे दर्शन घेतले आहे. १५ लाख यात्रेकरू बद्रीनाथला गेले होते. तर १४ लाख भाविक केदारनाथला दर्शनासाठी गेले होते. त्याचबरोबर गंगोत्री येथे सहा लाख यात्रेकरूंनी आणि यमुनोत्री येथे पाच लाख यात्रेकरूंनी भेट दिली आहे. भाजपा नेते अमित मालवीय यांनी पंतप्रधान मोदींच्या केदारनाथ भेटीदरम्यान ट्विटरद्वारे ही माहिती शेअर केली आहे.

Exit mobile version