भारतावर जीवापाड प्रेम करणाऱ्या ग्रीक कलाकाराचा पंतप्रधानांनी का केला उल्लेख?

"मन की बात" मध्ये साधला संवाद

भारतावर जीवापाड प्रेम करणाऱ्या ग्रीक कलाकाराचा पंतप्रधानांनी का केला उल्लेख?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’मध्ये महात्मा गांधींचे आवडते भजन ‘वैष्णव जन’ ट्विटरवर शेअर केले. विशेष म्हणजे, पंतप्रधानांनी शेअर केलेले गाणे कॉन्स्टॅटिनोस कलिन्झिस या ग्रीक गायकाने स्वरबद्ध करून गेले होते. ग्रीक वाद्याद्वारे हे गाणे गेले होते. , “तुम्ही सर्वानी हे गाणे कधी ना कधी ऐकलेच असेल. शेवटी हे गाणे बापूंचे आवडते गाणे आहे, पण जर मी म्हंटले की ते संगीत देणारे गायक ग्रीसचे आहेत, तर तुम्ही ऐकाल. नक्कीच आश्चर्यचकित व्हाल आणि ही गोष्ट तुम्हाला नक्कीच अभिमानास्पद वाटेल असे पंतप्रधान मोदी यांनी मन कि बात या कार्यक्रमात बोलताना सांगितले.

मन की बात या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या कार्यक्रमाच्या शताब्दीकडे आपण वेगाने वाटचाल करत आहोत. हा कार्यक्रम माझ्यासाठी १३०कोटी देशवासीयांशी जोडण्याचे आणखी एक माध्यम आहे. प्रत्येक भागाच्या आधी खेड्यापाड्यातून आणि शहरांमधून आलेली पत्रे वाचणे, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंतचे ऑडिओ संदेश ऐकणे, हा माझ्यासाठी एक आध्यात्मिक अनुभव आहे.

महात्मा गांधी यांच्या या गाण्याचे उदाहरण देताना पंतप्रधान म्हणाले, हे गाणे ग्रीसच्या कॉन्स्टॅटिनोस कलिन्झिस या गायकाने स्वरबद्ध करून गांधीजींच्या १२५ जयंतीच्या दिवशी गायले होते. पण आज मी त्यांची आठवण वेगळ्या कारणासाठी करत आहे. त्यांना भारत आणि भारतीय संगीत याबद्दल खूप प्रेम होते. त्यांचा भारतावर इतका जीव आहे की ते गेल्या ४२ वर्षात जवळपास दरवर्षी भारतात येऊन गेले. भारतीय संगीताचा स्रोत आणि भारतीय संगीत पद्धतीचा त्यांनी अभ्यास केला.

हे ही वाचा :

पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या मुलीचा कुचिपुडी डान्स व्हायरल

पंतप्रधान मोदींना धमकी देणाऱ्याला गुजरातमधून अटक

फडणवीस उद्धव ठाकरेंना म्हणाले, काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही …!

शिंदे गटातील आमदारांनो प्लिज नाराज व्हा ना!

विविध प्रकारचे ताल, राग आणि विविध भारतीय गाण्याच्या घराण्याचा अभ्यास केला भारतीय संगीत क्षेत्रात योगदान देणाऱ्या अनेक मान्यवरांचा देखील त्यांनी अभ्यास केला आहे भारतीय शास्त्रीय संगीताचे विविध पैलू त्यांनी समजून घेतले. भारतातील आपले हे सर्व अनुभव त्यांनी पुस्तक रूपातून सादर केले आहेत. इंडिया म्युझिक या त्यांच्या पुस्तकात जवळपास ७६० छायाचित्रे आहेत. यातील बहुतांश छायाचित्रे त्यांनी स्वतः काढलेली आहेत. दुसऱ्या देशांमध्ये भारतीय संस्कृतीबद्दलचा हा उत्साह आनंद देणारा आहे, असेही पंतप्रधान म्हणाले

संगीत वाद्य निर्यातीत ३.५ पट वाढ
गेल्या आठ वर्षात भारतीय संगीत वाद्यांच्या निर्यातीमध्ये जवळपास ३. पटीने वाढ झाली आहे. इलेक्ट्रिकल वाद्यांची निर्यात ६० पटीने वाढली आहे. भारतीय संस्कृती आणि संगीताची आवड जगभरात वाढली आहे. अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, जपान, ब्रिटन हे देश भारतीय वाद्यांचे जास्त खरेदीदार आहेत. आपल्या देशात संगीत, नृत्य आणि कलेची समृद्ध परंपरा आपल्या देशात आहे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे असतोच पंतप्रधान यावेळी म्हणाले

Exit mobile version