चंदीगड विमानतळाला ‘शहीद भगतसिंग’ यांचे नाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मन की बात' मध्ये घोषणा

चंदीगड विमानतळाला ‘शहीद भगतसिंग’  यांचे नाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ९३ व्या मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ मध्ये आझादीच्या अमृत महोत्सवाविषयी चर्चा केली. पंतप्रधानांनी स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण केले आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले. पंतप्रधानांनी शहिद भगतसिंग यांचेही स्मरण केले आणि चंदीगड विमानतळाला त्यांचे नाव देण्याची घोषणा केली.

चंदीगड, पंजाब आणि हरियाणातील लोकांचे अभिनंदन करताना पंतप्रधान म्हणाले की, याची खूप प्रतीक्षा होती. ‘आजपासून तीन दिवसांनी म्हणजेच २८ सप्टेंबरला अमृत महोत्सवाचा खास दिवस येत आहे. या दिवशी आपण भारतमातेचे शूर पुत्र भगतसिंग यांची जयंती साजरी करू. भगतसिंग यांच्या जयंतीपूर्वी त्यांना आदरांजली म्हणून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज २५  सप्टेंबर हा दिवस देशातील प्रख्यात मानवतावादी, विचारवंत पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो. हेच त्यांच्या विचारांचे सौंदर्य आहे, जगाची मोठी उलथापालथ त्यांनी आयुष्यात पाहिली होती. विचारधारांच्या संघर्षाचे ते साक्षीदार झाले.

चंदीगड विमानतळाच्या नावावरून पंजाब आणि हरियाणामध्ये बराच काळ वाद सुरू होता. अनेक बैठकीनंतर विमानतळाला शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यावर एकमत झाले. ऑगस्टमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि हरियाणाचे उपमुख्यमंत्री यांच्यात झालेल्या बैठकीत विमानतळाला भगतसिंग यांचे नाव देण्यावर सहमती झाली होती.

हे ही वाचा:

बारावीनंतर विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना करता येणार नोकरी

अमेरिका का म्हणतोय UNSC मध्ये भारताला कायमस्वरुपी सदस्यत्व द्या?

… आणि पंतप्रधान मोदींनी परभणीच्या चिमुरडीला पाठवलं पत्र

‘ज्यांना दूध पाजले म्हणता त्या शिवसैनिकांचा त्याग, मेहनत आहे पक्षवाढीत’

राष्ट्रीय खेळ खास प्रसंग

राष्ट्रीय खेळांचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘गुजरातमध्ये २९ सप्टेंबरपासून राष्ट्रीय खेळांचे आयोजन करण्यात येत आहे.’ हा एक अतिशय खास प्रसंग आहे, कारण अनेक वर्षांनी राष्ट्रीय खेळांचे आयोजन केले जात आहे. यापूर्वीचे कार्यक्रम कोविड महामारीमुळे रद्द करावे लागले होते. या क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक खेळाडूला माझ्या शुभेच्छा. या दिवशी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मी त्यांच्यामध्ये असेन.आज भारत पॅरा स्पोर्ट्समध्येही यशाचा झेंडा फडकवत आहे. अनेक स्पर्धांमध्ये आपण सर्वजण याचे साक्षीदार आहोत. आज तळागाळातील दिव्यांगांमध्ये फिटनेस कल्चरला चालना देणारे अनेक लोक आहेत. यामुळे दिव्यांगांच्या आत्मविश्वासाला खूप बळ मिळते असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

Exit mobile version