वंदे भारतमुळे रोजगाराच्या नवनव्या संधी उपलब्ध होतील!

नऊ वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाष्य

वंदे भारतमुळे रोजगाराच्या नवनव्या संधी  उपलब्ध होतील!

वंदे भारत रेल्वेमुळे रोजगारात वाढ होत असून रोजगाराच्या नवनव्या संधीही त्यामुळे उपलब्ध होत आहेत. शिवाय, या रेल्वेमुळे पर्यटकांच्या संख्येतही वाढ होत आहे, अशा शब्दांत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारतच्या गाड्यांमागील कारणमीमांसा केली.

 

 

मोदींनी रविवारी नऊ वंदे भारत रेल्वेगाड्यांची भेट नागरिकांना दिली. दक्षिण मध्य रेल्वेसह ९ रेल्वेगाड्यांना मोदींनी हिरवा झेंडा दाखविला. व्हीडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे मोदींनी काचीगुडा यशवंतपूर, विजयवाडा ते एमजीआर चेन्नई सेंट्रल या मार्गावरील वंदे भारतचे उद्घाटन केले. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवदेखील यावेळी उपस्थित होते.

 

 

पंतप्रधान म्हणाले की, आधुनिक कनेक्टिव्हिटीच्या विस्ताराची ही अभूतपूर्व अशी संधी आहे. विकासाची ही गती आणि लय ही १४० कोटी भारतीयांच्या आशाआकांक्षांशी मिळतीजुळती आहे. आता ज्या रेल्वेगाड्या सुरू होत आहेत, त्या अधिक आरामदायक आणि आधुनिक आहेत. या वंदे भारत रेल्वेगाड्या नवा उत्साह, जोश, नव्या प्रेरणेचे प्रतीक आहे.

हे ही वाचा:

निज्जरच्या हत्येनंतर एफबीआयने यूएस खलिस्तान्यांना केले होते सावध !

भारताच्या जी-२० अध्यक्षपदाची संयुक्त राष्ट्रांकडून स्तुती !

शरद पवारांनी केले अदानींच्या प्रकल्पाचे उद्घाटन

लव्हलिना, हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने केले दिमाखदार संचलन

गेल्या काही वर्षात रेल्वेस्टेशन्स विकसित होऊ शकलेले नाहीत. त्यांच्या विकासाचा मार्ग खुला झाला आहे. अमृतकाळात झालेल्या या स्टेशन्सना अमृत भारत स्टेशन्स म्हणून ओळखले जाणार आहे. यासंदर्भात रेल्वेकडून दिलेल्या माहितीनुसार काचीगुडा यशवंतपूर या मार्गावरील वंदे भारत ही याच मार्गावरील अन्य रेल्वेंच्या तुलनेत कमी वेळेत या दोन्ही स्टेशन्सना जोडणार आहे. विजय वाडा एमजीआर चेन्नई सेंट्रल मार्गावरील वंदे भारत ही आतापर्यंतची सर्वात वेगवान गाडी असेल. पश्चिम बंगालमधील पटना हावडा आणि रांची हावडा या मार्गांवरही वंदे भारत रेल्वे धावेल.

 

 

पंतप्रधानांनी १५ फेब्रुवारी २०१९मध्ये पहिल्या वंदे भारतला हिरवा झेंडा दाखविला होता. दिल्ली आणि वाराणसी या दरम्यान ही रेल्वे चालते. ही रेल्वे मेक इन इंडियाचे प्रतीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील काही प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी २७ सप्टेंबरला जाणार आहेत. छोटा उदयपूर येथे त्यांचे भाषणही होणार आहे.

Exit mobile version