32 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरविशेषकर्तव्य पहिले, अंत्यसंस्कारानंतर पंतप्रधानांनी बंगालला दिली वंदे भारतची भेट

कर्तव्य पहिले, अंत्यसंस्कारानंतर पंतप्रधानांनी बंगालला दिली वंदे भारतची भेट

Google News Follow

Related

पंतप्रधान मोदींच्या मातोश्री हिराबा यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. पंतप्रधानांनी त्यांच्या पार्थिवावर अहमदाबाद येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले. आईच्या मृत्यूमुळे दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही पंतप्रधांनी आपल्या आईप्रमाणेच आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिले. अंत्यसंस्कारानंतर मोदी यांनी आपल्या नियोजित कार्यक्रमानुसार मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. मला पश्चिम बंगालमध्ये यायचे होते, मात्र वैयक्तिक कारणांमुळे मी तेथे येऊ शकलो नाही. मी बंगालच्या जनतेची माफी मागतो असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पश्चिम बंगालला पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन भेट दिली. याशिवाय, पंतप्रधानांनी बंगालमध्ये ७,८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणीही केली. वंदे भारत ट्रेन हावडा-न्यू जलपाईगुडी मार्गावर धावणार आहे. हावडा स्टेशनवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि रेल्वे मंत्री उपस्थित होते. कोलकाता येथे नव्याने बांधण्यात आलेल्या जोका-तरातला मेट्रो मार्गाचे उद्घाटनही मोदींनी केले. जोका, ठाकूरपुकुर, साखर बाजार, बेहाला चौरस्ता, बेहाला बाजार आणि तरातला या ६ स्थानकांसह ६.५ किमीचा भाग २,४७५ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे.

पंतप्रधानांनी  राज्यातील आणखी चार रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन केले. यामध्ये बोईंची-शक्तीगढ तिसरी लामार्ग , दनकुनी-चंदनपूरचौथी मार्गिका , निमतिता-न्यू फरक्का दुहेरी लाईन आणि अंबारी फलकाटा-न्यू मायनागुरी-गुमनीहाट दुहेरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. यासोबतच ३३५ कोटी रुपयांहून अधिक खर्च करून विकसित करण्यात येणाऱ्या न्यू जलपाईगुडी रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासाची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली.

हे ही वाचा:

निर्दयी कोण शिंदे की उद्धव ठाकरे? स्था

यी समितीचे माजी अध्यक्ष राडा का करतायत?

ब्राझिलचे महान फुटबॉलपटू, तीनवेळा विश्वविजेते ठरलेले पेले कालवश

स्थायी समिती अध्यक्षांचा वचपा?

बंगालच्या पवित्र भूमीला नतमस्तक होण्याची संधी

अनेक प्रकल्प हाती घेतल्यानंतर पंतप्रधानांनी त्यांचे भाषणही केले. बंगालच्या पवित्र भूमीला नतमस्तक होण्याची आज माझ्यासाठी संधी आहे, असे मोदी म्हणाले. बंगालच्या प्रत्येक कणात स्वातंत्र्याचा इतिहास जडलेला आहे. ज्या भूमीवरून ‘वंदे मातरम’चा जयघोष झाला, तिथून ‘वंदे भारत’चा झेंडा फडकवण्यात आला. मोदी म्हणाले की, आज ३० डिसेंबरच्या तारखेला इतिहासात खूप महत्त्व आहे. ३० डिसेंबर १९४३ रोजी नेताजी सुभाष यांनी अंदमानमध्ये तिरंगा फडकवून भारताच्या स्वातंत्र्याचा ध्वज उभारला. २०१८ मध्ये या घटनेच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त मी अंदमानला गेलो होतो आणि एका बेटाचे नाव नेताजींच्या नावावर ठेवले असे पंतप्रधांनी सांगितले.

ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला शोक

ममता बॅनर्जी यांनी हिराबा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आईपेक्षा मोठे काहीही नाही. पंतप्रधान आजचा दिवस तुमच्यासाठी खूप दुःखाचा आहे. हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, अशी मी देवाकडे प्रार्थना करेन.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा