‘लता दीदींच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती’

‘लता दीदींच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती’

स्वर कोकिळा लता मंगेशकर यांचे आज ६ फेब्रुवारी रोजी निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर उपचार सुरू होते. काल ५ फेब्रुवारी रोजी त्यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, अखेर त्यांनी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लता दीदींच्या निधनाचे वृत्त समजताच जगभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.

लता दीदी यांच्या जाण्याने दुःख व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे शब्द नाहीत अशा भावना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत. लता दीदी या अत्यंत दयाळू आणि काळाजी करणाऱ्या अशा होत्या. लता दीदींच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली असून ती कधीही भरून निघू शकत नाही, असे नरेंद्र मोदी म्हणाले. येणाऱ्या पिढ्या त्यांना भारतीय संस्कृतीतील एक दिग्गज म्हणून स्मरणात ठेवतील. त्यांच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

लता दीदींच्या गाण्यांमध्ये विविध भावनाव्यक्त केल्या जात. त्यांनी भारतीय चित्रपट जगतातील अनेक बदल जवळून पाहिले आणि अनुभवले आहेत. तसेच त्या नेहमीच भारताच्या प्रगतीबद्दल आग्रही होत्या. त्यांना नेहमीच एक शक्तिशाली आणि विकसित भारत पाहायचा होता, अशा भावना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.

हे ही वाचा:

स्वर कोकिळा लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड

बीसीसीआयची मोठी घोषणा; खेळाडूंना मिळणार एवढी रक्कम

भारताने पाचव्यांदा विश्वचषकावर नाव कोरत रचला इतिहास!

तीस हजारहून अधिक सापांना जीवनदान देणारा हा ‘स्नेक मास्टर’ आहे कोण? वाचा सविस्तर

एक सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून लता दीदींची ओळख होती. लता मंगेशकरांच्या कारकीर्दीची सुरूवात त्यांच्या वयाच्या १३ व्या वर्षी १९४२ मध्ये झाली होती. त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली आहेत. तर २० पेक्षा अधिक अधिक भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये त्यांनी गायन केले आहे. प्रामुख्याने त्या मराठी भाषेतील गाणी गायल्या आहेत. लता मंगेशकर यांना गान कोकिळा म्हणूनही ओळखले जात. २००१ मध्ये त्यांना ‘भारतरत्‍न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Exit mobile version