भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने देण्यात येणारा पहिला वहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात येणार आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मुंबई येथील षण्मुखानंद सभागृहात हा सोहळा पार पडत आहे.
प्रति वर्षी मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार प्रदान केला जातो. दर वर्षी २४ एप्रिल रोजी दिला जातो. या वर्षी गायक राहुल देशपांडे, अभिनेत्री आशा पारेख, अभिनेता जैकी श्रॉफ आणि नूतन टिफिन सप्लायर्सच्या तीन डबेवाल्यांचाही दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे हे ८० वे वर्ष आहे.
हे ही वाचा:
गुवाहाटी महापालिका निवडणुकीत भाजपाने ६० पैकी ५८ जागा जिंकल्या
‘मन की बात’ मधून पंतप्रधानांनी विचारले ‘हे’ सात प्रश्न
कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच मोदी काश्मीरमध्ये
राणा दाम्पत्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
तर या वर्षीपासून दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे या वर्षीपासून लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सुरु करण्यात येत आहे. या वर्षी ६ फेब्रुवारी रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांची दुःखद निधन झाले. त्यांनतर आता लता मंगेशकर यांच्या नावानेही एक विशेष पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. प्रति वर्षी देशकार्यासाठी आयुष्य समर्पित केलेल्या एका व्यक्तीला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पहिल्या वर्षीच्या पुरस्काराचे मानकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लता मंगेशकर यांच्यात अतिशय जीवाभावाचे नाते होते. लता मंगेशकर या नरेंद्र मोदींना आपला लहान भाऊ मानत असत. तर नरेंद्र मोदींच्या मनातही लता दीदींच्या बद्दल अतीव आदर असतो.