‘महाराष्ट्र बारव मोहीम’ सुरू करणाऱ्या रोहन काळेंच पंतप्रधान मोदींकडून कौतुक

‘महाराष्ट्र बारव मोहीम’ सुरू करणाऱ्या रोहन काळेंच पंतप्रधान मोदींकडून कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील कानाकोपऱ्यातील देशासाठी अनमोल असे कार्य करणाऱ्या सामान्यांचे कार्य देशासमोर आणत असतात. यावेळी नरेंद्र मोदी यांनी देशभरातील स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या स्वच्छता दुतांच्या कामाचं कौतुक केले.

महाराष्ट्रातील अशाच एका व्यक्तीचा त्यांनी यावेळी उल्लेख केला. ती व्यक्ती म्हणजे रोहन काळे. रोहन काळे हे महाराष्ट्रात भटकंती करत करत ऐतिहासिक बारवांची (विहीर) स्वच्छता करत असतात. आज ‘मन की बात’च्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी कौतुक करत त्यांचे काम देशभरातील लोकांपर्यंत पोहचवले.

महाराष्ट्रातील रोहन काळे हे व्यवसायाने एचआर विभागात कार्यरत होते. त्यांनी महाराष्ट्रातल्या पायऱ्यांच्या विहिरींचे संरक्षण करण्याची मोहीम सुरू केली आहे. यामधल्या अनेक विहिरी शेकडो वर्षे जुन्या आणि प्राचीन आहेत.

राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक बारव आज वाईट अवस्थेत आहेत. अनेक बारव मध्ये कचरा साचलेला दिसतो. हीच गोष्ट लक्षात घेऊन रोहन काळे यांनी हे काम सुरु केले. वेगवेगळ्या जिल्ह्यांना ते भेट देऊन स्वत: बारव स्वच्छ करतात आणि स्थानिकांना या बारवांच महत्त्व समजावून सांगतात. हे काम मोठ्या स्तरावर घेऊन जाण्यासाठी त्यांनी आता महाराष्ट्र बारव मोहीम सुरु केली आहे.

हे ही वाचा:

चीनमधील त्या विमान अपघातात १३२ जणांचा मृत्यू

‘मातोश्री’ चरणी यशवंत जाधवांचे २ कोटी आणि ५० लाखांचे घड्याळ

किरीट सोमय्या, निलेश राणे रत्नागिरी जिल्ह्यातून हद्दपार

चेन्नईला नमवून कोलकाताचा विजयी शुभारंभ

गुजरातमध्ये अशा पाय-यांच्या विहिरींना ‘वाव’ असे म्हणतात. गुजरातसारख्या राज्यामध्ये वाव खूप मोठी भूमिका पार पाडते. या विहिरी किंवा आडांच्या संरक्षणासाठी ‘जल मंदिर योजने’ने खूप महत्वाची भूमिका निभावली आहे. संपूर्ण गुजरातमधल्या अनेक विहिरींना, आडांना पुनर्जीवित करण्यात आले. यामुळे त्या त्या भागामध्ये जलस्तर वाढण्यासाठी चांगली मदत मिळाली. असेच अभियान तुम्हीही स्थानिक पातळीवर चालवू शकता, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

Exit mobile version