भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा आणि त्याची पत्नी रिवाबा जडेजा या दोघांचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी पत्र लिहीत जडेजा दाम्पत्याचे कौतुक केले आहे. जडेजा दाम्पत्याने केलेल्या समाजकार्यासाठी खास त्यांचे कौतुक करण्यात आले आहे.
रविंद्र जडेजा आणि रिवाबा यांनी जामनगर येथील पोस्ट ऑफिसमध्ये १०१ सुकन्या समृद्धी खाती उघडली आहेत. त्यांची मुलगी निध्याना हिच्या ५ व्या वाढदिवशी जडेजा दाम्पत्याने हा उपक्रम केला आहे.
त्यानंतर त्यांच्या याच कार्याचं कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहीत त्याची दखल घेतली आहे. “पोस्ट ऑफिसमध्ये १०१ मुलींसाठी १०१ सुकन्या समृद्धी खाती तुम्ही उघडली आहेत. तुमचा हा निर्णय खूपच कौतुकास्पद असून या यामुळे आनंद झाला. तुमची मुलगी निध्यना हिचा ५ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रत्येक खात्यात सुरुवातीची रक्कम जमा करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. अशा स्वयंसेवी प्रयत्नांमुळे समाजात एक सकारात्मक संदेश निर्माण होईल आणि त्यातून सर्वांना प्रेरणा मिळेल,” असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच निध्याना हिला त्यांनी आशीर्वाद देखील दिले आहेत.
Kind words 🙏🏻 pic.twitter.com/mXjBIPYW7K
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) August 8, 2022
हे ही वाचा:
पाकिस्तान, श्रीलंकेच्या वाटेवर बांगालादेश
खेळाडूंची पुढची पिढी तयार होतेय, ‘तो’ व्हिडीओ बघून आनंद महिंद्रांची प्रतिक्रिया
संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे चित्रा वाघ संतापल्या
डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरावर ‘एफबीआय’चा छापा
रविंद्र जाडेजा आणि रिवाबा यांनी त्यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त १०१ मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खातं उघडलं. या प्रत्येक खात्यात त्यांनी ११ हजार जमा केले आहेत. जून महिन्यात रविंद्र जाडेजानं १०१ मुलींसाठी सुकन्या योजनेअंतर्गत खातं उघडणार असल्याचं सांगितलं होतं.