26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेष'स्वातंत्र्यदिनानिमित्त सामुहिक शक्तीचे घडले दर्शन'

‘स्वातंत्र्यदिनानिमित्त सामुहिक शक्तीचे घडले दर्शन’

अमृत ​​महोत्सव आणि स्वातंत्र्यदिनाच्या या विशेष प्रसंगी आपल्या देशाच्या सामूहिक शक्तीचे दर्शन झाले असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मधून देशाला संबोधित केले आहे. यावेळी त्यांनी अमृत महोत्सवासोबतच ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेबाबतही चर्चा केली आहे. अमृत ​​महोत्सव आणि स्वातंत्र्यदिनाच्या या विशेष प्रसंगी आपल्या देशाच्या सामूहिक शक्तीचे दर्शन झाले असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

स्वातंत्र्याच्या या महिन्यात आपल्या देशात, प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात अमृत महोत्सवाची अमृतधारा वाहत होती. मला जी काही पत्रे आलीत त्यातील काही पत्रच अशी असतील ज्यावर तिरंगा नव्हता. संपूर्ण देश तिरंगामय झाला होता. स्वातंत्र्यदिनाच्या या प्रसंगाने आपण देशाची सामूहिक शक्ती पहिली. एवढा मोठा देश असून, एवढी विविधता, पण तिरंगा फडकवताना सगळे जण त्याच भावनेने वाहत असल्याचे दिसत होते. लोक स्वतः पुढे आले, तिरंग्याच्या अभिमानाचे पहिले रक्षक बनले. भारतासह जगभरातील भारतवासीयांनी जगभरात स्वातंत्र्याचा अमृतमोहोत्सव साजरा केला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

स्वच्छता मोहिम आणि लसीकरण मोहिम राबवतानाही आपण देशाचा हा उत्साह अनुभवला होता. आपला एवढा मोठा देश, इतकी विविधता, पण तिरंगा फडकवताना आपल्या सर्वांच्या मनात देशभावना दाटून आल्याचे दिसत होते, असे सांगत पंतप्रधान मोदींनी देशवासियांचे कौतुक केले.

विशिष्ट तिरंग्यांचे उदाहरण देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, कृष्णील अनिल जीहे या युवा सहकारी, एक पझल आर्टिस्ट आहेत आणि त्यांनी मोज़ॅक कलेच्या माध्यमातून विक्रमी वेळेत सुंदर तिरंगा तयार केला. यासोबतच कर्नाटकातील कोलार येथील लोकांनी ६३० फूट लांब आणि २०५ फूट रुंद तिरंगा हातात धरून एक अनोखा देखावा सादर केला होता. तर आसाममधील सरकारी कर्मचाऱ्यांनी दिघालीपुखुरी युद्ध स्मारकावर तिरंगा फडकवण्यासाठी स्वत:च्या हाताने सुमारे २० फुटांचा तिरंगा तयार केला.

हे ही वाचा:

गृहमंत्री अमित शहा मुंबईत ‘या’ गणेशोत्सवाला भेट देणार

Twin Tower Demolition: काही सेकंदात कोसळले भ्रष्टाचाराचे टॉवर

…. पण नवाब मलिक आणि संजय राऊत बनू नका!

Twin Tower Demolition: नोएडामधले ट्वीन टॉवर कसे पाडणार? वाचा सविस्तर

देशाच्या सीमेवर, खोल समुद्रात तसेच सियाचीनच्या बर्फात सगळीकडे आपला तिरंगा फडकला. संपूर्ण देशच तिरंगामय झाला होता. इंदूरमधील लोकांनी मानवी साखळीच्या माध्यमातून भारताचा नकाशा तयार केला, तर चंदीगडमधल्या तरुणाईनी महाकाय मानवी तिरंगा साकारला. या दोन्ही विक्रमांची नोंद गिनीज रेकॉर्डमध्ये सुद्धा झाली आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा