संकेतस्थळावर पंतप्रधानांनी कायमची कोरली आई ‘हिराबा’ ची आठवण

नरेंद्र मोदी यांनाही आपल्या हिराबाची आठवण सतावत आहेत. ही आठवण आता पंतप्रधानांनी आपल्या वेबसाईटवरवर कायमची कोरली आहे.

संकेतस्थळावर पंतप्रधानांनी कायमची कोरली आई ‘हिराबा’ ची आठवण

पंतप्रधानांचे आपल्या आईवर किती प्रेम होते हे वेगळे सांगायची गरज नाही. गुजरातला गेल्यानंतर पंतप्रधान वेळात वेळ काढून आपल्या आईसमवेत काही क्षण व्यतीत करायचे. मनुष्य कितीही मोठा झाला तरी तो आईला विसरू शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आपल्या हिराबाची आठवण सतावत आहेत. ही आठवण आता पंतप्रधानांनी आपल्या वेबसाईटवरवर कायमची कोरली आहे.पंतप्रधान मोदी यांनी ” माँ” असे लिहून आपल्या मनातील कप्पाच उलगडलेला आहे.

” माँ” ही पंतप्रधान आणि त्यांची आई या दोघांमधील अखंड प्रेमाची साक्ष देणारी मायक्रो साइट आहे. पंतप्रधान मोदींच्या अधिकृत वेबसाइटवर ती होस्ट केलेली बघायला मिळते. माये बरोबरच आठवणींच्या रूपाने प्रकारे आईला वाहिलेली ही श्रद्धांजली आहे. ही मायक्रोसाईट आई हिराबा याना समर्पित आहे.

हे ही वाचा:

अमेरिकेत ‘भारतीयांना’ आता सहज ‘व्हिसा’ मिळणार

१२ मार्च १९९३… ३० वर्षांनंतर मोदींनी चव्हाट्यावर आणला व्होरा समितीचा अहवाल….

धावत्या रिक्षावर १७व्या मजल्यावरून पडला लोखंडी रॉड आणि…

‘त्या’ जोडप्याचा भांग पिऊन बाथरुममध्ये झाला मृत्यू

वेबसाइट आई आणि मुलामध्ये सामायिक केलेले प्रेम आणि अतूट बंध दर्शवते. मायक्रोसाइटमध्ये आपल्या मुलांना दिलेल्या शिकवणीचे क्षण दर्शवणारे हिराब यांचे व्हीडिओ तसेच आपल्या आईसाठी खास लिहिलेल्या पंतप्रधान मोदी यांचा एक खास ब्लॉग देखील साईटवर बघायला मिळतो. सोबतच या ब्लॉगचा हिंदीतील ऑडियो देखील आहे. या वेबसाइटच्या लाइफ इन द पब्लिक डोमेनच्या चार खंडांमध्ये हिराबा मोदी यांचे जीवन आणि प्रवास टिपला आहे. याच विभागात हिराबेन यांच्या नम्र व साध्या जीवनाचे चित्रण करणारी छायाचित्रे आणि व्हिडिओ आहेत. तसेच विविध ब्लॉग आपल्या आईबरोबर व्यतीत केले क्षण, गप्पा याचाही समावेश आहे.

नेशन रिमेम्बर्स विभागात त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. ‘वर्ल्ड कॉन्डोल्स’ विभागात अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्यासह प्रमुख जागतिक नेत्यांच्या ट्वीट्सचा संग्रह आहे. यामध्ये हीराबेन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदी यांना पाठवण्यात आलेल्या शोक संदेशाचा समावेश आहे.

‘सेलिब्रेटिंग मदरहुड’ हे मातांसाठी वैयक्तिक ई-कार्ड तयार करण्यासाठी आणि पाठवण्यासाठी समर्पित असलेले एक पान आहे. इथे क्लिक करून कोणीही आपल्या आवडीचे टेम्पलेट निवडू शकतात आणि कार्डवर खास संदेश जोडू शकतात. ही मायक्रोसाइट पंतप्रधान मोदींच्या https://www.narendramodi.in या अधिकृत वेबसाइटवर तसेच नरेंद्र मोदी या वैयक्तिक अॅपवर बघता येते.

Exit mobile version