पंतप्रधान मोदींचा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जाणाऱ्या खेळाडूंशी संवाद

खेळाडूंचे मनोबल वाढवत विजयासाठी दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान मोदींचा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जाणाऱ्या खेळाडूंशी संवाद

क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानली जाणारी ऑलिम्पिक स्पर्धा लवकरच पॅरिसमध्ये खेळवली जाणार आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये २६ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान ऑलिम्पिक स्पर्धेच आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत भारताचे खेळाडू देखील सहभागी होणार आहेत. १२० खेळाडूंचे पथक भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. सर्वाधिक मेडल जिंकून इतिहास रचण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे. या खेळाडूंचे मनोबल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिकला जाणाऱ्या खेळाडूंची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.

ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारे भारतीय खेळाडू देशाला अभिमानास्पद वाटतील आणि १४० कोटी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांनी ऑलिम्पिंकला जाणाऱ्या खेळाडूंसोबत बोलताना ‘खेलो इंडिया’बद्दल चर्चा केली. या दरम्यान ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याच्याशी सुद्धा मोदींनी चर्चा केली. नरेंद्र मोदींनी नीरज चोप्रा याला त्याच्या आईने बनवलेला चुरमा कधी खाऊ घालशील? असा प्रश्न विचारला. तेव्हा नीरज चोप्रा म्हणाला, हो सर, लवकरच हरियाणातून चुरमा घेऊन येणार आहे. २०२१ साली नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेती कामगिरी केली होती. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळाडूंना नाश्त्याला आमंत्रित केलं होतं. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्रासाठी स्पेशल चूरमा बनवून घेतला होता.

हे ही वाचा:

‘कल्की २८९८ एडी’ चारशे पार!

ब्रिटनमध्ये सत्तांतर; १४ वर्षांनंतर लेबर पक्ष सत्तेत

काँग्रेस नेते सुनील केदार अडचणीत; नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील रोखे घोटाळा हत्येपेक्षा गंभीर

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या निर्माण करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या सूचना

यावेळी नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिकला जाणाऱ्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवला. क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना भेटून माहिती घेण्याचा माझा प्रयत्न असतो असं त्यांनी सांगितलं. यावेळी सुद्धा तुम्ही भारताच नाव उज्वल कराल, हा आम्हाला विश्वास आहे, असं मोदी म्हणाले. “मी अशा सुद्धा काही खेळाडूंना ओळखतो, जे कधीच परिस्थितीला दोष देत नाहीत. मेहनत करुन नाव कमावतात. ऑलिम्पिक शिकण्याच एक मोठ मैदान आहे. बरेच खेळाडू शिकण्यासाठी खेळतात. अनेक विद्यार्थी परिस्थितीला दोष देतात. त्यांची जीवनात प्रगती होऊ शकत नाही” असं मोदी म्हणाले.

Exit mobile version