पंतप्रधान मोदींचे परदेश दौरे विकासासाठी, तर उद्धव ठाकरेंची टीका विनोदासाठी असल्याचे भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या शीशमहलवरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. पंतप्रधान मोदींनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर चर्चेला उधान आले आहे. तसेच आजच्या कॅगचा अहवालानुसार केजरीवाल यांनी त्यांच्या बंगल्यावर केलेल्या खर्चाची माहितीही समोर आली. अहवालानुसार, मुख्यमंत्री निवासस्थानातील टीव्हीच २८ लाख रुपयांचा असल्याची माहिती उघड झाले. तसेच केजरीवालांच्या शीशमहालावर ८ नव्हे तर ३३ कोटींचा खर्च झाल्याची माहिती समोर आली.
याच दरम्यान, शीशमहलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला भाजपा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. पंतप्रधान मोदींचे परदेश दौरे विकासासाठी, तर उद्धव ठाकरेंची टीका विनोदासाठी असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. तसेच मोदींचा साधेपणा मातोश्री टू बांधणाऱ्या उद्धव ठाकरेंना दिसणार नाही, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा :
केजरीवालांच्या शीशमहालावर ८ नव्हे ३३ कोटींचा खर्च, २९ लाखांचा फक्त टीव्ही!
पन्नूला आली धमकी देण्याची पुन्हा खुमखुमी, महाकुंभला दिला इशारा
HMPV व्हायरस; गोडसे म्हणतायत नो टेन्शन!
चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीटकरत म्हटले, अडीच वर्षे घरात बसून ‘अतिविलास‘ करणारे उद्धव ठाकरे सामनामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतात. हा मोठा विनोदच म्हणावा लागेल. विलासी असा आरोप करणाऱ्यांनी पंतप्रधान मोदीजींचा जीवनप्रवास बघावा. एक चहावाला पंतप्रधान होतो, तेव्हा तो त्यांच्या साधेपणानं आणि मेहनतीनंच पंतप्रधान मोदीजींच्या सक्षम नेतृत्वाखालील देशाचा विकास होतोय.
मोदीजींनी त्यांच्या राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यात कायमच साधेपणा जपला आहे. मात्र, त्यांचा साधेपणा ‘मातोश्री टू‘ बांधणाऱ्या उद्धव ठाकरेंना दिसणार नाही. त्यामुळेच ते दिल्लीत शीशमहल बांधणाऱ्या अरविंद केजरीवालांच्या मदतीला धावून आले आहेत. पंतप्रधानांचे परदेश दौरे देशाची प्रतिमा मजबूत करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय संबंध दृढ करण्यासाठी असतात. भेटवस्तूंचा विषय उगाच गाजवून देशातील विकासावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न आहे. भारताचे जागतिक स्थान उंचावले गेले आहे, याचा तुम्हाला खरा त्रास होत आहे. तूर्तास इतकेच, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.
अडीच वर्षे घरात बसून ‘अतिविलास‘ करणारे उद्धव ठाकरे सामनामधून पंतप्रधान आदरणीय श्री. @narendramodi जींवर टीका करतात. हा मोठा विनोदच म्हणावा लागेल. विलासी असा आरोप करणाऱ्यांनी पंतप्रधान मोदीजींचा जीवनप्रवास बघावा. एक चहावाला पंतप्रधान होतो, तेव्हा तो त्यांच्या साधेपणानं आणि…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) January 6, 2025